अभिनेत्री कंगना राणावत विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. पुण्यातील वकिलांची मागणी,
Kangana Ranaut news: प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी नवनवीन शक्कल लढवली जात आहे.
Kangana Ranaut news :पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे :
उचलली की जीभ लावली ताळूला, आजकाल नविन ट्रेंड सुरू झाले आहे. प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी नवनवीन शक्कल लढवली जात आहे.
कोणत्या ना कोणत्या प्रकरणात तोंड खुपसून प्रसिद्धी मिळवली जात आहे.
असाच प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी सिनेअभिनेत्री कंगना राणावताने मुंबई शहर हे काश्मीर असल्याचे वक्तव्य करून देशवासियांच्या भावना दुखावुन महाराष्ट्र पोलीस खात्याचा व भारत देशाचा व देशातील संविधानाचा अवमान केला आहे.
यामुळे कंगना राणावत विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची लेखी मागणी पुण्यातील सुप्रसिद्ध वकिल समिर शेख यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांकडे केली आहे.

Kangana Ranaut @KanganaTeam या तिच्या टि्वटर अकाउंट वरुन मुंबई शहर हे पाकिस्तान व्याप्त काश्मीर असल्याचे संबोधुन,
देशवासियांच्या भावना दुखावुन भारत देशाचा व देशाच्या संविधानाचा अवमान करून देशवासीयांचा रोष ओढवून घेतला आहे.
तिच्या या ट्वीट मुळे सोशल मीडियावर तिचा चांगलाच समाचार घेतला जात आहे.
वाचा : kangana ranaut ko home minister anil deshmukh ki fatkar
अॅड समिर शेख यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले की कंगना राणावत हिचे वक्तव्य हे भारताच्या संविधानाचा अपमान करणारे आहे.
त्यामुळे तिने जाणुन-बुजुन भारतीय संविधानाचा अपमान केलेला आहे. तीचे वक्तव्य भारत देशामध्ये फुट पाडणारे आहे.
त्यामुळे पाकिस्तान सारख्या शत्रु राष्ट्राला भारत विरोधात प्रपोगंडा करण्यासाठी मदत होण्याची शक्यता आहे.
कंगनाने हिंमत असेल तर मला मुंबईत येण्यापासुन रोखुन दाखवा असे चिथावणीखोर वक्तव्य केल्याने कोविडच्या आपत काळात कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.
कंगना राणावत हिच्या देशविरोधी ट्वीटची ताबडतोब दखल घेऊन तिच्याविरुद्ध देशद्रोहाचा,
देशात अशांतता माजवण्याचा तसेच आय.टी अॅक्ट व इतर कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी अॅड समिर शेख,
अॅड सुफियान शेेख, अॅड सैफान शेख यांनी गृहमंत्री अनिल देशमुख व पुणे शहर पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

‘Crime Branch News ’संपर्क : 9284447822
Pingback: (Vehicle theft arrested) मौजमजेसाठी वाहनचोरी करणा-या गुन्हेगारांना अटक
Pingback: (Human Rights Commission) पोलीस महासंचालकांना मानवी हक्क आयोगाचे समन्स