चारित्र्याच्या संशयातून भर रस्त्यात पत्नीचा गळा चिरून खून


🖕 Click Here

(Murder of wife) हडपसर परिसरात शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली ही घटना

(Murder of wife) crime branch news प्रतिनिधी : पुणे : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा चिरून खून करण्यात आला.

हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास हा प्रकार घडला.

खून करणाऱ्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे. हडपसर परिसरातील बंटर बर्नाड शाळेजवळ हा प्रकार घडला.

Advertisement

अंजली नितीन निकम (वय २२, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

या प्रकरणी पती नितीन निकम ( रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी, मूळ गाव दहिगाव, ता. माळशिरस, जि. सोलापूर) याला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे.

वाचा : स्वीगी व झोमॅटोच्या डिलेव्हरी बॉयला अटक

Advertisement
murder-of-wife-out-of-suspicion-of-character

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 वर्षांपूर्वी या दोघांचे लग्न झाले होते. त्यांना चार वर्षाचा मुलगा आहे.

नितीन निकम हा भोसरीतील एका कंपनी इलेक्ट्रिशियनचे काम करतो.

पत्नीवर असलेल्या चारित्र्याच्या संशयातून या दोघा नवरा -बायकोत नेहमी भांडण होत होते. काल दुपारी देखील त्यांच्यात याच कारणावरून भांडण झाले.

🖕 Click Here
Advertisement

त्यानंतर दोघेही दुचाकीवरून दहिगाव येथे जाण्यासाठी निघाले. यावेळी त्यांच्यात पुन्हा एकदा भांडण झाले.

नितीन निकम याने भररस्त्यात दुचाकी थांबवून गळा चिरून पत्नी अंजलीचा खून केला.दरम्यान खून केल्यानंतर नितीन निकम हा आत्महत्या करण्यासाठी निघाला होता.

तत्पूर्वी त्याने भावाला फोन करून घडलेला प्रकार सांगितला आणि स्वतः आत्महत्या करणार असल्याचे सांगितले.

Advertisement

परंतु, भावाने त्याला मुलाचे कारण पुढे करून आत्महत्या करू नको असे सांगितले.

या सर्व प्रकारानंतर नितीन निकम स्वतः हडपसर पोलीस ठाण्यात हजर होऊन घडलेला प्रकार सांगितला.

हडपसर पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पुढील तपास हडपसर पोलीस करत आहे.

Advertisement

वाचा : एका नगरसेवकाच्या भावा सहित इतरांवर 420 चा गुन्हा दाखल

🖕 Click Here