नवले पुलाजवळील विचित्र अपघातात सात वाहनांचे नुकसान
Sinhagad Road News : नवले पुलाजवळील विचित्र अपघातात सात वाहनांचे नुकसान.
Sinhagad Road News : Police News 24 : सिग्नलला थांबलेल्या टेम्पोवर मागून आलेल्या ट्रकने धडक दिल्याने पुढील पाच वाहने एकमेकांवर आदळली.
या विचित्र अपघातात सातही वाहनांचे 1 लाख 85 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. आज, बुधवारी रोजी सकाळी नऊच्या सुमारास नन्हे येथील नवले
पुलाजवळ हा विचित्र अपघात घडला.
या प्रकरणी धीरज देविदास लोखंडे (वय 26, सावंत विहार,कात्रज, पुणे) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
VIDEO पहा : Nawale Bridge जवळील विचित्र अपघातात सात वाहनांचे नुकसान
त्यानुसार ट्रक चालक दशरत राठोड (वय:24 ,रा. सुगुरा, ता. चितापूर , जि . गुलबर्गा, कर्नाटक) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
Pingback: (YERWADA POLICE STATION) रेशनिंग किट मधील तेल चोरीची पोलीसात तक्रार
Pingback: (CRIME BRANCH NEWS) शिकलगरी टोळीतील गुन्हेगाराना अटक