Skip to content
( Tadipar ) गुन्हे शाखा युनिट एक ने केली कारवाई
(Tadipar ) क्राईम ब्रांच न्युज प्रतिनिधी पुणे:
अमिताब गुप्ता हे जेव्हा पासून पुण्याचे पोलीस आयुक्त झाले आहे त्यांनी अनेक गुन्हेगारांची कंबर मोडून त्यांना कारागृहात पाठविले आहे.
तर अनेकांना तडीपार करून पुण्यातून हद्दपार ही केले आहे.
पण यातून ही काही तडीपार गुंड लपूनछपून पुण्यात प्रवेश करत असतात ,
अश्या तडीपारांना तातडीने धरून त्यांच्यावर कारवाई करण्याचे काम पोलीस अधिकारी व कर्मचारी करत असतात.
अश्याच एका तडीपाराला धरून त्याला त्याची जागा दाखविण्याचे काम गुन्हे शाखा युनिट एक चे अधिकारी व कर्मचारी यांनी केले आहे.
मिळालेल्या माहिती नुसार दि.06/09/2021 रोजी गुन्हे शाखा युनिट एक चे अधिकारी व कर्मचारी हद्दीत पेट्रोलिंग करीत होते
पेट्रोलिंग करत असताना पोलीस नाईक अमोल पवार यांना माहिती मिळाली कि सध्या तडीपार असलेला रेकॉर्ड वरिल गुन्हेगार हा सोनवणे हॉस्पिटल जवळ कासेवाडी पुणे येथे उभा आहे,
व त्याच्या जवळ 1 रॅम्बो चाकू आहे व तो काहीतरी उपद्रव करण्याच्या तयारीत आहे .
ही माहिती मिळताच सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले त्याची कसून चौकशी केली असता त्याने त्याचे नाव विनायक बंडू कराळे (वय 22 वर्ष रा. कासेवाडी पुणे) असल्याचे सांगितले.
त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कडे 1 रॅम्बो चाकू मिळुन आला .
त्याचे विरुद्ध आर्म ॲक्ट 4(25) महा .पो.का.क.142 अन्वये फिर्याद देवून त्यास पुढील कारवाईसाठी खडक पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
आरोपीवर खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत
खडक पोलीस स्टेशन गुरनं 1.295/2016 भादवि कलम 457,457,380
2. गुरनं 4/2017 भादवि कलम 392
3.गुरनं 132/2014 भादवि कलम 454,457,380,511
4.गुरनं 23/2014 भादवि कलम461,457,380,34
5.गुरनं 433/2017 भादवि कलम 380,34
6.गुरनं 352/2016, 454,457,380,411,34
7. गुरनं 358/2016 भादवि कलम 380, 411, 34
8.351/2016 भादवि कलम 380,411,34
11. 82/2019 भादवि कलम 394,341
16.3264/2013 म.पो.का. कलम 37(1) 17.289/2017
18.3012/2016 म.पो.का कलम 142,37(1) सदर आरोपी विरुद्ध खडक पोलिस स्टेशन येथे एकुण 18 गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी पोलिस उप निरीक्षक संजय गायकवाड, सुनील कुलकर्णी पोलीस अंमलदार अमोल पवार,
अजय थोरात,अशोक माने, शशिकांत दरेकर, तुषार माळवदकर, यांनी केली आहे.
Pingback: gang raped in pune पुण्यातील वानवडी परिसरात 14 वर्षीय मुलीवर सामुहिक...