पुण्यातील PSIने Dreem ११ वर दीड कोटी रुपये जिंकले, पण आता वाढल्या अडचणी.
( Dreem 11) पिंपरी : पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे हे गेल्या दोन दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. ड्रीम ११ या ऑनलाइन गेममधून त्यांनी दीड कोटी रुपये जिंकले आहेत.
मात्र या दीड कोटींमुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सर्व प्रशासकीय आणि कायदेशीर बाबी तपासून त्यांच्यावर करावाई करण्यात येईल, मग झेंडे यांची चौकशी करण्यात येईल, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी सतीश माने यांनी दिली असून त्याचा तपास पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांच्याकडे देण्यात आला आहे. त्यामुळे झेंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
झेंडे यांनी बांगलादेश आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या सामन्यासाठी ड्रीम इलेव्हनवर टीम लावली होती.
सामना संपल्यानंतर सोमनाथ झेंडे यांनी त्यांचा मोबाईल चेक केला तेव्हा त्यांचं स्वप्न पूर्ण झालं होतं. दीड कोटी जिंकल्यानंतर सब इन्सपेक्टर करोडपती झाले आहेत, त्यामुळे त्यांचं कुटुंबही खूश झालं आहे.
मित्राचा गुप्तांग कापून खून करणाऱ्या कोंढव्यातील तरुणाला जन्मठेपेची शिक्षा