लॉकडाऊनच्या काळात गुटखा विक्री करणारे जेरबंद.
एक लाखाचा मुद्येमाल हस्तगत
पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : पुणे शहरातील बरेच भाग कोराना व्हायरसमुळे कंटेंनटमेंट झोन म्हणून घोषित आहे. याचाच फायदा
घेत पुण्यातील काशेवाडी भवानी पेठ येथे गुटखा विक्री सुरू असल्याने गुन्हे शाखेच्या युनिट १ ने कारवाई करत १ लाखांचा
मुद्देमाल जप्त केला आहे. हकीकत अशी की दिनांक १६ जून २०२० रोजी युनिट १ कडील अधिकारी व कर्मचारी हे यूनिट १ चे
हृदीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होत असल्याने त्याला प्रतिबंध करणेकामी पेट्रोलींग फिरत असतांना पो.ना. सचिन जाधव यांना
त्यांचे बातमी दारामार्फत बातमी मिळाली सादीक शेख व त्याचा भाऊ ऐैयतेशाम शेख रा.कासेवाडी भवानीपेठ, पुणे हे दोघे मिळून
रहाते घरात कासेवाडी भवानी पेठ पुणे येथे गुटखा, सिगारेट व तंबाखूची चोरून विक्री करीत आहेत.अशी खात्रीशीर माहिती
मिळाल्याने युनिट १, गुन्हे शाखेकडील अधिकारी व कर्मचारी यांनी माहितीची शहानिशा करून खडक पोलीस ठाणेकडील
अधिकारी व कर्मचारी मदतीस घेवून, कासेवाडी, राजीव गांधी कॉम्पलेक्स समोर छापा टाकला व आरोपी नामे १) सादीक
मेहमुद शेख, वय २८ वर्षे रा. ३११,कासेवाडी, भवानी पेठ पुणे २) ऐयतेशाम निजामुद्दीन शेख, वय १८ वर्षे रा. ३११, कासेवाडी,
भवानी गेठ पुणे यांना ताब्यात घेतले. व अन्न व औषध प्रशासन, पुणे विभागाकडील अधिकारी श्री आर. बी. कुलकर्णी यांना
पाचारण करून त्यांचे ताब्यातून प्रतिबंधीत असलेला अन्न पदार्थ, सेंटेड पान मसाला, आरएमडी प्रिमीयम पान मसाला, हिरा पान
मसाला, जाफरानी जर्दा गोवा १००० गुटखा, गोवा १००० पान मसाला, पी- जर्दा केसरयुक्त विमल पान मसाला, व्हि-१ तंबाखु व
सिगारेट एकुण रु.१.०७.३१४/- चा माल जप्त करण्यात आला आहे. त्यांचे विरुध्द खडक पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात
आला आहे. आरोपोंना सदर गुन्हयात अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना न्यायालयीन
कोठडी मंजूर करण्यात आली आहे.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे अशोक मोराळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण वायकर, पोलीस
उपनिरीक्षक संजय गायकवाड, पोलीस कर्मचारी सचिन जाधव.प्रकाश लोखंडे, इम्रान शेख, इस्फान मोमीन, सुभाष
पिंगळे, गजानन सोनुने, प्रशंत गायकवाड, तुषार माळवदकर, यांनी कारवाई केली आहे.