डिलिव्हरी बॉयच ग्राहक व ऑनलाईन सेलरला घालत आहे गंडा
पुणे : ऑनलाईन मागवलेल्या मोबाईलच्या पॅकिंग बॉक्समध्ये बंद पडलेला मोबाईल किंवा साबण ठेवून ग्राहकांची फसवणूक होत असल्याचा प्रकार पुण्यातून समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे फ्लिपकार्टचे कर्मचारीच ग्राहकांना गंडा घातल होते.
या प्रकरणात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने चार जणांना अटक केले असून त्यांच्याकडून ४.५ लाख रुपये किमतीचे १९ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,पुण्यामधील एका मोबाईल दुकान मालकाने ७.५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार दिली होती. पोलिसांनी या घटनेचा तपास करत असताना अनेक ग्राहक बड्या कुरियर कंपन्यांमार्फत मोबाईल खरेदी करतात.
रामटेकडी आनंदनगर भागात एकावर जीवघेणा हल्ला; ३ जणांविरोधात वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
तसेच त्या कुरियर कंपन्या मोबाईल दुकानात ऑर्डर नोंदवून ग्राहकांना मोबाईल घरपोच देत असल्याचे समोर आले.याच माहितीच्या आधारे पोलिसांनी एक कुरियर कंपनी गाठली. त्या कुरियर कंपनीचे चार कर्मचारी तो बॉक्स मोबाईल दुकानदाराला देताना त्यात जुना बंद पडलेला मोबाईल, फरशीचा तुकडा किंवा साबण ठेवून देत होते.
पोलिसांनी या प्रकरणात अधिक तपास करत या कंपनीतील चार कर्मचाऱ्यांना अटक केली. या कारवाईमध्ये आरोपींच्या ताब्यातून ४.५ लाख रुपये किमतीचे विविध कंपनीचे १९ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. चक्क डिलिव्हरी बॉय च ग्राहकांची फसवणूक करत असल्याचा प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.