(Doctor installed spy camera) : डॉक्टर जगताप पोलिसांच्या जाळ्यात
(Doctor installed spy camera) क्राईम ब्रांच न्यूज – पुणे|
भारती विद्यापीठ परिसरातील एका प्रशिक्षणार्थी डॉक्टर महिलेच्या बाथरूममध्ये स्पाय कॅमेरा लावल्या प्रकरणी पोलिसांनी एका एमडी डॉक्टरला अटक केली आहे.
त्या डॉक्टर ने हे छुपे कॅमेरे लावल्याचे समोरे आल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
(spy camera) छुपा कॅमेरा असणारा बल्ब हा अमेझॉनवरून मागवला असल्याचे समोर आले आहे.
(Dr. Sujit Abajirao Jagtap) डॉ.सुजित आबाजीराव जगताप (वय 42) असे अटक केलेल्या डॉक्टरचे नाव आहे.
वाचा : चारित्र्याच्या संशयातून भर रस्त्यात पत्नीचा गळा चिरून खून
याप्रकरणी 32 वर्षीय पीडित महिला डॉक्टरने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यावरून अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 6 जुलैला घडला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुजित जगताप ये एमडी आहेत. त्यांचा हिराबाग येथे मोठा दवाखाना आहे.
ते भारती विद्यापीठ परिसरातील एका हॉस्पीटलमध्ये लेक्चर घेण्यासाठी देखील जात होते.
दरम्यान, यातील फिर्यादी एका हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टर आहेत.त्या परिसरातील क्वॉर्टरमध्ये एका मैत्रिणीसीबत राहतात.
नेहमीप्रमाणे काम संपल्यानंतर त्या सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास रूमवर परत आल्या.
फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेल्यानंतर लाईट लावली. पण, तो बल्ब चालू झाला नाही.
बल्ब पाहिला असता तो जरा वेगळा वाटल्याने त्यांना शंका आली.
त्यां महिला डॉक्टरने इलेक्ट्रिशियनला बोलावून बल्ब दाखवला, तेव्हा इलेक्ट्रिशियनने त्या बल्बमध्ये छुपा कॅमेरा असल्याचे सांगितले.
त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली.
या गुन्ह्याचा तपास भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक संगीत यादव या तपास करत होत्या.
गेल्या 4 दिवसांपासून परिसरातील सीसीटीव्ही तसेच येथील सुरक्षा रक्षक आणि फिर्यादी यांना संशयित वाटतअसलेल्या व्यक्तींकडे पोलीस चौकशी करत होते.
यादरम्यान एका ठिकाणी डॉक्टर जगताप कैद झाले.
त्यांना चौकशीसाठी बोलविल्यानंतर त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली.
आज न्यायालयात डॉक्टर जगताप ला हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठाडी सुनावली.
Pingback: (Kondhwa police arrest motorcycle thief) मोटार सायकल चोर कोंढवा पोलीसांच्या.