पोलीसाने महिलेला गुंगीचे औषध देऊन केला अत्याचार, FIR दाखल,
FIR against police officer : पुण्यातील भवानी पेठ पोलीस लाईन येथील प्रकार.
FIR against police officer : पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे :
एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने एका ५० वर्षीय महिलेला शीतपेयीतून गुंगीचे औषध देऊन महिलेवर अत्याचार करत फोटो,
विडिओ काढल्याची घटना घडली असून पोलीस महाशयांवर पुण्यातील समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यामुळे पोलीस खात्यात खळबळ उडाली आहे.सोलापूर येथील पोलिस निरीक्षक चंद्रकांत भगवानराव माने यांच्याविरुद्ध महिलेच्या फिर्यादीवरून गुन्हा झाला आहे.
वाचा > तडीपार गुन्हेगारास गुन्हे शाखेने केली अटक,
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस निरीक्षक चंद्रकांत माने हे सध्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात नियुक्तीस आहे.
माने पुण्यात कार्यरत असताना त्यांची व फिर्यादी महिलेची ओळख झाली होती.
त्यानंतर घर दाखविण्याच्या बहाण्याने चंद्रकांत माने यांनी महिलेला भवानी पेठेतील पोलिस लाईनमध्ये नेले होते.
त्यावेळी त्याने शीतपेयात गुंगीचे औषध देऊन महिलेवर अत्याचार केले. अत्याचार करतानाचे फोटो व व्हिडिओ रेकॉर्डिंग केले.
व्हिडिओ नातेवाईकांना पाठविण्याची धमकीही दिली. व तुझ्यासोबत लग्न करेन अशी बतावणी करत वारंवार शरीरसंबंध प्रस्थापित केले.
यासंदर्भात कोणाकडे वाच्यता न करण्याची धमकी देत वारंवार शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले.
त्रास असाहिय झाल्याने महिलेने पोलीसांकडे फिर्याद दिली असून पुढील तपास समर्थ पोलीस करत आहे.
वाचा > सय्यदनगर मधिल शाळेने विद्यार्थीनीचे नाव व धर्म बदलल्याचा धक्कादायक प्रकार ?

‘Crime Branch News ’संपर्क : 9284447822
Pingback: (Fraud by sanctioning loan) ४ लाखांचे कर्ज मंजुर करुन दुसऱ्या बँकेच्या खात्यात ...