पीएमपीएमल बसमध्ये चोऱ्या करणारी टोळी अटकेत.
डेक्कन, दत्तवाडी, शिवाजीनगर, भारती विद्यापीठ, कोथरुड, व इतर पोलिस ठाण्याच्या हद्दीत केल्या चोऱ्या.
क्राईम ब्रांच न्यूज प्रतिनिधी पुणे :
कमी वर्दळ असलेल्या ठिकाणी अंधाराचा फायदा घेवुन रस्त्याने पायी जाणा-या तसेच मोटार सायकलवरुन जाणा-यांना थांबवुन त्यांना घातक हत्याराचा धाक दाखवुन लुटणा-या टोळीचा पर्दाफाश गुन्हे शाखेने केला आहे.
२९ सप्टेंबर रोजी पोलीस अंमलदार अनिकेत बाबर,व दत्ता सोनावणे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की,
पॅगो रिक्षा नं. एमएच- १२- क्युआर -३९६१ मधुन मोहन जाधव, शितल वाडेकर व त्याचे साथीदार सर्व साथीदार रात्रीच्या वेळी बाहेर पडतात व एकांत ठिकाणाचे अंधाराचा फायदा घेवुन रस्त्याने पायी जाणा-या तसेच मोटार सायकलवरुन जाणा-यांना थांबवुन त्यांना घातक हत्याराचा धाक दाखवुन त्यांच्याकडील पैसे व अंगावरील सोन्याचे दागिने हिसकावुन तसेच महिलांच्या हातातील बांगडया कट करुन गुन्हे करतात व आता पुर्ण तयारीनिशी दरोडयाचा गुन्हा करण्यासाठी पुणे शहरात फिरत असुन ते पुण्यातील डेक्कन चौपटीजवळच्या नदीपात्र लगत जाणार आहे,
अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने त्याप्रमाणे कार्यवाही करण्याकरीता युनिट-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे यांनी पोलीस अधिकारी व अंमलदार यांना आदेशित केले.
डेक्कन चौपटीजवळच्या नदी पात्रात गुप्तपणे सापळा लावून गुप्तपणे पाहणी करता पॅगो रिक्षा नं. एमएच/१२/क्युआर/३९६१ मधुन काही इसम व महिला येवुन ओकारेश्वर मंदीराच्या मागील भिंतीलगत शनिवार पेठ येथे रिक्षा पार्क करुन आडबाजुस संशयीतरित्या एकत्र जमुन आपसात चर्चा करीत असताना दिसले
खात्री होताच सदर ठिकाणी छापा टाकुन सदर इसमांना व महिलांना जागीच पकडुन त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारता रिक्षा चालकाने आपले नाव अरुण शिवाजी गायकवाड वय ३८ वर्षे रा.आनंदनगर सर्वोदय कॉलनी म्हसोबा मंदीराशेजारी मुंढवा,