पुणे शहरातील आर्थिक गुन्हे शाखेची जबरदस्त कारवाई..! शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ.
शिक्षण क्षेत्र गुन्हे शाखेच्या रडारवर.
पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : पुणे शहर हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे शहर आहे. या शहरातच विद्येचे माहेरघराच सुरंग लावण्याचा प्रयत्न काहि जणांनी केला आहे.
पुणे शहरातील आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हे दाखल करुन घरावर छापे टाकल्याने शहरात एका प्रकारे मोठी खळबळ उडाली आहे.
बनावट शिक्षक भरतीची मान्यता तयार करुन त्या खऱ्या असल्याचे भासवून शासनाची फसवणूक करणाऱ्या प्रकरणात पुणे आर्थिक,
गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणाचा मुख्य सुत्रधार आणि मुख्याध्यापक संभाजी शिरसाट याला अटक करण्यात आली आहे.
त्याच्यासह आणखी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संभाजी शिरसाट याला आता न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
याप्रकरणी भविष्य निर्वाह निधी पथकाचे अधीक्षक राजेंद्र बाबासाहेब साठे वय ४६ यांनी समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.