खबर्‍या करतोस का असे म्हणत नाना पेठेत युवकाला मारहाण,

Samarth Police Station : खबर्‍या करतोस का असे म्हणत नाना पेठेत युवकाला मारहाण,

pune-samarth-police-station-fir-against-youth

Samarth Police Station : पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : पुणे: नाना पेठेतील घोडेपीर दर्ग्या जवळ संशय घेऊन एका युवकावर हल्ला करण्यात आला आहे.

सुमित घाटा (वय १८ रा. गणेश पेठ पुणे ) असे जख्मी झालेल्या युवकाचे नाव आहे.

मारहाणी संदर्भात सुमित याने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कुणाल सोमनाथ रावळ, (वय २६ वर्षे, रा.३०९ नानापेठ, पुणे, ) मयुर दत्तात्रय थोरात (२१ वर्षे,रा.२३ नानापेठ, पुणे)

कुणाल वसंत झेंडे,(वय १८ वर्षे,रा.२३० नानापेठ, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत.

शाहु वसाहत येथील खुनातील फरार आरोपीस अटक,

आमच्या खबर्‍या करतोस का ? असे म्हणत सुमितला शिवीगाळ करुन धमकी देत कुणाल रावळ व मुयर थोरात यांनी लोखंडी रॉडने मारहाण केली आहे.

🖕 Click Here

त्यांच्या बरोबर असलेल्या एकाने सुमितला हाताने व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.

सुमित याच्या डाव्या पायाला मार लागल्याने त्याला दुखापत झाली आहे .

याप्रकरणी सदरील आरोपींवर समर्थ पोलीस ठाण्यात ३२४, ३४१, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डिवटीवर दारु पिणा-या पुणे मनपाच्या सुरक्षा अधिका-याला कोविड योद्धा चे प्रमाण पत्र देण्याची मागणी

🖕 Click Here

One thought on “खबर्‍या करतोस का असे म्हणत नाना पेठेत युवकाला मारहाण,

Comments are closed.