हडपसर येथील चिकन सेंटर मधील खून प्रकरणातील आरोपी गजाआड,
Chicken Center worker :अमिर चिकन सेंटर या दुकानातील कामगाराचा खून करण्यात आला होता
Chicken Center worker: पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : पुणे :हडपसर चिकन सेंटर मधील मध्ये कामगाराचा दिवसाढवळ्या खून झाल्याने हडपसर परिसरात
दहशत निर्माण झाली होती. हडपसर परिसरात दिवसाढवळ्या होत असलेले खूनी हल्ले, खून यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण
पसरलाने हडपसर पोलीस ठाणे पुन्हा एकदा चर्चेवर आले आहे. चिकन सेंटर मधील कामगाराचा खून झाल्याने हडपसर पोलिसांनी
कंबर कसली होती व आरोपीचा शोध घेतला जात होता. अखेर हडपसर पोलिसांच्या ताब्यात गुन्हेगार अडकला आणि त्याच्या
मुसक्या आवळल्या आहेत. लहू उर्फ भाऊ बन्सी शिंदे वय २२ रा.वर्षे, रा.मुळ गाव साठेवडगाव, आंबेवाडी, ता आष्टी जि.बीड
याला अटक करण्यात आली आहे.आकाश भोसले खून प्रकरणी तेजस होळकर,वय ३३ वर्षे,रा.हडपसर पुणे यांनी फिर्याद दिली आहे.
Pingback: (Ambulance service in pune) अॅम्ब्युलन्स सर्व्हिसेस विरोधात ४२० चा गुन्हा दाखल