लिव्ह इन रिलेशनशिपचा अंत भयावह रेणुका ने केला जावेदचा…
लिव्ह इन रिलेशनशिपचा अत्यंत भयावह शेवट , जावेदला संपवलं लक्षात येताच..गेल्या काही वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपचा दुर्दैवी अंत होत असल्याच्या अनेक घटना समोर येत असताना अशीच एक घटना बंगळूर इथे समोर आलेली आहे.
एका महिलेने तिच्या लिव्ह इन पार्टनरची चाकूने सपासप वार करून हत्या केलेली असून बंगळुरू शहरातील हूलिमाऊ भागात एका अपार्टमेंटमध्ये ही घटना घडलेली असून पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केलेली आहे .
उपलब्ध माहितीनुसार , रेणुका ( वय 34 ) असे आरोपी महिलेचे नाव असून तिने तिचा प्रियकर जावेद ( वय 29 ) याची हत्या केलेली आहे. आरोपी महिला ही मयत व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये राहत होती. पाच सप्टेंबर रोजी त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले त्यावेळी रेणुका हिने चाकूचा वापर करत जावेदवर वार केले आणि तो रक्ताच्या थारोळ्यात पडला.आपली चूक लक्षात आल्यानंतर तिने रडायला सुरू केले आणि त्यानंतर शेजारी गोळा झाल्यानंतर जावेद याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले होते.
कोंढव्यात अनधिकृत बांधकामावर पालिकेचा हातोडा
तिथे गेल्यानंतर त्याची प्रकृती खालावली हे लक्षात आल्यानंतर ती पुन्हा खोलीवर आली आणि पळून जाण्याचा प्रयत्न करू लागली हे लक्षात आल्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तिच्या घरात कोंडून टाकले. पोलिसांनी तात्काळ तिला अटक केलेली असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.