शासकीय पिवळा दिवा व गर्हमेंट ऑफ इंडिया असे नाव वापरून केली लाखोंची फसवणूक.

Government yellow light : फिर्यादी कडून रोख व आरटीजीएस एनईएफटीद्वारे एकूण १२,०६,०००/ रूपये घेतले

Government yellow light : पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : सध्या शासकीय नावांचा व लोगोंचा वापर सरासर वाढला आहे.

तसेच संघटना, संस्थांचे नावे हे एक सारख्या वाटत असल्याने नागरिकांच्या फसवणूकीत वाढ होत चालली आहे.

तर आयआरएस असल्याचे भासवून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

या संदर्भात योगेश वाल्हे,वय-४२ रा. भाऊ पाटिल रोड , पुणे यांनी फिर्याद दिली आहे.वाल्हे यांचे मंगलम चेंबर्स, अभुदय बँके जवळ,पौड रोड कोथरुड पुणे

येथे ॲक्युपंक्चर क्लिनिक मध्ये एकजण आयआरएस अधिकारी असल्याचे खोटे सांगून अधिकारी म्हणून स्वतःचा फोटो व त्यावर नाव लिहून,

खोटे बनावट आयकार्ड तयार असलेले सरकारी गणवेश घालून खाजगी पांढ-या रंगाची चारचाकी वाहनास शासकीय पिवळा दिवा आणि गर्हमेंट ऑफ इंडिया असे नाव लिहिलेले वाहन वापरत होता.

वाचा : बनावट राजीनामे तयार केल्याप्रकरणी शाळेतील महिला उपाध्यक्षा विरोधात गुन्हा दाखल

तर दोन अनोळखी व्यक्तींना शासकीय गणवेशात ड्रायव्हर व गनमॅन म्हणून घेवून फिर्यादी यांना कमी किंमतीत तेलंगणा येथील सरकारी गाडयांचे लिलावा मधील,

🖕 Click Here

सन २०१७ ची टोयाटो फॉर्च्युनर कार व खराडी पुणे येथील पंचशील टॉवर मधील फ्लॅट कमी किमतीत देतो असे आमिष दाखविले.

आणि वाल्हे यांचे विश्वास संपादन करुन फॉच्च्युनर कार व खराडी येथील फ्लॅट पोटी

रोख व आरटीजीएस एनईएफटीद्वारे एकूण १२,०६,०००/ रूपये घेतले

तर फॉर्च्युनर कार न देता व खराडी येथील फ्लॅटचा व्यवहार पुर्ण न करता फिर्यादीचा विश्वासघात करून,

फिर्यादी यांचेकडून घेतलेले १२,०६,०००/ रक्कमेचा,स्वतःचे अर्थिक फायदयासाठी अपहार करुन,

फिर्यादीची आर्थिक फसवणुक केल्या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

VIDEO पहा : भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाचा भोंगळ कारभार, गेले पाच महिन्यांपासून नागरिक खड्ड्यात

🖕 Click Here