सिगारेट दुकानफोड्या करणाऱ्या आंतरराज्यीय चोरट्यांच्या टोळीस गुन्हे शाखा १ ने केले जेरबंद
सिगारेट दुकानांच्या घरफोड्या करणारी आंतरराज्यीय चोरट्यांची टोळी जेरबंद
क्राईम ब्रांच न्यूज :पुणे : नानापेठ येथील जय अबे ट्रेडर्स किराणा दुकानाचा पाठीमागचा दरवाजा व लॉक तोडून ५.० ९ , ३५० / – रुपये किंमतीची सिगारेटची पाकिटे व बॉक्स असा माल चोरुन पसार झालेल्यांना गुन्हे शाखा १ ने केले जेरबंद.
दिनांक १६/०४/२०२३ रोजी फिर्यादी यांनी त्याचे नानापेठ येथील जय अबे ट्रेडर्स किराणा दुकानाचा पाठीमागचा दरवाजा व लॉक कोणीतरी अज्ञात चोरट्याने तोडुन दुकानाच्या आत प्रवेश करुन ५.० ९ , ३५० / – रुपये किंमतीची सिगारेटची पाकिटे व बॉक्स असा माल चोरुन नेलेबाबत दि . १७/०४/२०२३ रोजी समर्थ पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ९ ६ / २०२३ . भा.द.वि. कलम ४५४,४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता .
वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली युनिट १ , गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अमलदार असे समांतर तपास करीत असताना गुन्ह्यातील घटनास्थळावरील आजुबाजुचे तांत्रिक विश्लेषणाव्दारे तीन आरोपींचे वर्णन निष्पन्न करून सदर आरोपी है रिक्षा मध्ये बसुन गेल्याचे दिसून आले .
सदर रिक्षाच्या बाहेरील वर्णनावरुन सदरच्या रिक्षाचा वडगाव शेरी पर्यंत मागोवा घेतला असता सदर संशयित आरोपी है साईकृपा हौसींग सोसायटी वडगाव शेरी पुणे येथे रिक्षातुन उतरल्याचे निष्पन्न केले .
त्यानंतर दि . २५.०४.२०२३ रोजी पोलीस अंमलदार , अमोल पवार व आण्णा माने यांनी सदर वर्णनाचे आरोपींचा शोध घेतला असता सदर तीन आरोपीपैकी एक आरोपी हा साईकृपा होसींग सोसायटी , वडगाव शेरी पुणे येथे रहात असलेबाबत खात्री केली .
सदरची आरोपीबाबतची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनिट १ , शब्बीर सैय्यद यांना कळविली असता त्यांनी लगेच सपोनि आषिश कवठेकर व अमलदार यांची टीम तयार करून त्यांना सुचना व मार्गदर्शन करून बातमीचे ठिकाणी जावुन कारवाई करण्याचे तोंडी आदेश दिले .