माजी पोलीस निरीक्षकाच्या मुलावर करणी केल्याचा खळबळजनक प्रकार,
कोर्टाच्या आदेशाने सून आणि तिच्या कुटुंबावर गुन्हा दाखल.
पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : माजी पोलीस निरीक्षकाच्या मुलावर करणी केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.
तर या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने सून आणि तिच्या कुटुंबावर गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी निवृत्त पोलीस निरीक्षक मसाजी काळे यांनी चतुशृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
त्यानुसार सून अपर्णा नितीन काळे,अशोक बापूराव डुकरे, चंद्राक्षी अशोक डुकरे, कविता मोहन धोत्रे, तनुजा शिंदे, समीर अशोक डुकरे, मोहन नामदेव धोत्रे, यांच्यासह इतर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा जादूटोणा प्रतिबंध अन्वये गुन्हे दाखल केले आहे.मसाजी काळे यांनी पोलीस निरीक्षक म्हणून २ वर्षांपूर्वी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे.
मसाजी पिंपरी चिंचवड आयुक्तालयात नेमणुकीस होते. दरम्यान त्यांच्या मुलाचा २०१७ मध्ये अपर्णाशी विवाह झाला होता.