कारवाईसाठी गेलेल्या पुणे मनपाच्या अधिकाऱ्याला जीवे ठार मारण्याची धमकी,
कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : रस्त्यावरील कारवाईसाठी गेलेल्या पुणे महानगर पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आली आहे.
याप्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात जावेद शेख,अलीम शेख व चार महिलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत प्रकाश धुमाळ यांनी फिर्याद दिली आहे. पौड रोडवर भीमनगर झोपडपट्टी ते मयुर कॉलनी दरम्यान रस्त्यामध्ये येणारे अतिक्रमण काढण्याची कारवाई बुधवारी दुपारी करण्यात येत होती.
त्यावेळी आरोपींनी आमचे घर रस्ता रुंदीकरणात बाधित होत नाही. तुम्ही आम्हाला नोटीस दिली नाही. तुम्ही आम्हाला मोबदला दिला नाही. तुम्ही घर कसे पाडता बघून घेतो, आम्ही मेलो तरी चालेल,
परंतु तुम्हाला कामच करु देत नाही, असे म्हणून त्यांनी वृद्ध आईवडिलांना खोलीमध्ये बसवून आता तुम्ही कारवाई करा व त्यांना काही बरे वाईट झाले तर त्याला तुम्हीच जबाबदार असाल,
असे म्हणून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. तसेच आरोपींनी महापालिका सहाय्यक आयुक्त संदीप कदम यांना जीवे मारण्याची धमकी दिली.