पुणे पोलिसांचा अजब फतवा, पोलीस ठाणे,चौक्या वैयक्तिक असल्याची दिली माहीती
Pune Police : पोलीस ठाणे, चौक्या डागडुगजीची नियमावली वैयक्तिक असल्याचे सांगून पुणे पोलिसांनी नाकारली माहिती,
Pune Police : पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : पुणे पोलिसांचे पितळ उघडे पडेल आणि आपण दिलेल्या माहितीमुळे अडचणी वाढतील तर माहिती कशी नाकारायची एक उदाहरण पुणे पोलिसांनी दिले आहे.
माहिती अधिकार कायदा २००५ अस्तित्वात येऊन १४ वर्षे पूर्ण झाली आहे. तरी अद्यापही कायदा पुणे पोलिसांकडे पोहचलेला नाही.
किंवा माहिती दयाचीच नाही या आडमुठ्या धोरणामुळे आज कायद्याची सरासर पायमल्ली होत आहे.
अधिकाऱ्यांच्या अश्या वागण्यांमुळे आज अपिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
जी माहिती कलम ४ प्रमाणे स्वतःहून प्रसिद्ध करायची असूनही ते करत नसल्याने नागरिकांना अर्ज करावे लागत आहे.
वाचा : स्वतःच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला मार्केट यार्ड पोलिसांनी केले अटक
आणि माहिती कशी नाकारली जातीय असाच एक प्रकार अजहर अहमद खान यांनी उघडकीस आणला आहे.