परदेशात नोकरी लावण्याच्या अमिषाने गंडा घालणा-या महिलेला अटक,

(crime branch arrests woman) अस्तित्व लपवुन १६ वर्षापासुन आपले नाव बदलुन पोलीसांना गुंगारा देत होती.

(crime branch arrests woman) क्राईम ब्रांच न्यूज (प्रतिनिधी) :

परदेशात नोकरी लावून देते म्हणतं लोकांना गंडा घालणाऱ्या व तब्बल १६ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणा-या महिलेस गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे.‌

ज्ञानेश्वर विश्वास जमदाडे (वय ३२ रा – हिलटॉप सोनगिरी,धनकवडी पुणे) यांनी सन २००५ साली खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे.

सदर गुन्ह्यातील आरोपी १) अबिदअली मसुदअली (रा.१०७३ न्यु नाना पेठ ,अजीज मंजील बिल्डिंग पुणे,)

२)अब्दुलवहाब महमंदहनीफ मुजावर (रा –सैय्यदनगर , गंगा व्हिलेजसमोर हडपसर पुणे ) व

३) राहत सैय्यद मॅडम (रा – नुराणी मजिदजवळ , जुना मोटार स्टँड भवानी पेठ पुणे)

यांनी आपसात संगणमत करुन फिर्यादी व त्यांचे मित्र सुरेश रक्ती ,

प्रज्ञावंत करमरकर व इतरांना परदेशात नोकरी लावतो असे अमिष‌ दाखवले आणि त्यांचा विश्वास संपादन करुन,

त्यांचेकडुन‌ ४ लाख घेवुन त्यांना नोकरी न लावता व घेतलेले पैसे परत न देता त्यांचा विश्वास संपादन करुन फसवणुक केल्याबाबत त्यांचेविरुध्द तक्रार दिलेली होती.

त्यानुसार खडक पोलीस ठाण्यात ४२० चा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हे शाखा युनिट १ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार कार्यालयात हजर असताना पोलीस अंमलदार अमोल पवार यांना गुप्त बातमीदाराकडुन बातमी मिळाली की

परदेशामध्ये नोकरी लावण्याच्या बहाण्याने अनेक लोकांकडुन पैसे घेवुन त्यांची फसवणुकी करणारी

व १६ वर्षापासुन गुन्हयात फरार असलेली महिला राहत सैय्यद ही साकोरे नगर , विमाननगर पुणे या भागात आपले नाव बदलुन व अस्तित्व लपवुन राहत आहे.

साकोरे नगर विमाननगर पुणे या भागात पहाटेच्या वेळेस सापळा लावण्यात आला.

🖕 Click Here

वाचा : न्युज वेबसाईट बनवा व इतरांचा व्यवसाय जगभर पोहचवून पैसे कमवा.

संशयीत महिला सकाळी मॉर्निग वॉकसाठी जात असताना दिसली तिस ताब्यात घेतले व तिस नाव पत्ता विचारता प्रथम तिने आपले नाव अलका शर्मा असे असल्याचे सांगीतले .

परंतु तिच्याकडे सखोल चौकशी केली असता तिने आपले खरे नाव राहत तालीबअली सैय्यद ऊर्फ अलका भगवानदास शर्मा

वय ५४ रा – ३०३ आनंदयोग सोसायटी , साकोरेनगर विमाननगर पुणे मुळ रा – बी/३१२ डीडीओ प्लॅट जागीरपुरी दिल्ली असे असल्याचे सांगीतले आहे.

सखोल तपास केला असता तिचा गुन्हयात सहभाग असल्याचे व सदर गुन्हयामध्ये ती सुमारे सोळा वर्षापासुन फरार निष्पन्न झाले आहे.

राहत हिला पुढील कारवाईसाठी खडक पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह-आयुक्त डॉ.रविंद्र शिसवे,

अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे गुन्हे शाखा,पोलीस उप आयुक्त,श्रीनिवास घाडगे,गुन्हे शाखा,

सहा.पोलीस आयुक्त सुरेंद्रकुमार देशमुख, यांचे मार्गदशनाखाली युनिट-१ गुन्हे शाखा,

वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनिल कुलकर्णी,

पोलीस अंमलदार अजय थोरात, अमोल पवार, इम्रान शेख, तुषार माळवदकर,

महिला पोलीस अंमलदार मिना पिंजण व रुखसाना नदाफ यांनी केली आहे.

वाचा : ४ लाख किंमतीचा २० ग्रॅम १६० मिलीग्रॅम कोकेन विक्री करणाऱ्या नायजेरियन तरुणाला

🖕 Click Here