(Crime branch arrested Criminals) युनिट 1 गुन्हे शाखे कडुन कारवाई
(Crime branch arrested Criminals) Crime branch news प्रतिनिधी :
पुणे शहरामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये व जनतेच्या मालमतेचे रक्षण व्हावे
तसेच कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकार घडु नये म्हणुन पुणे शहरातील पोलीस अभिलेखावरील टोळीतील गुंड ,
दरोडा , जबरी चोरी , घरफोडी चो – या करणारे सराईत गुन्हेगार , यांचा शोध घेवुन त्यांच्या हालचालीवर नजर ठेवुन त्यांच्यावर कारवाई करत असतात ,
तसेच गुन्हेगारा विरुध्द कठोर कारवाई करण्याबाबत वरिष्ठांकडून आदेश दिलेले असल्याने पोलीस अधिकारी ,कर्मचारी जोमाने लागलेले आहे.
काल दिनांक 19/06/2021 रोजी पेट्रोलिंग करत असताना पोलीस नाईक अमोल पवार यांना त्यांच्या खब-या पासून माहिती मिळालीकी
सध्या तडीपार असलेला रेकॉर्ड वरिल गुन्हेगार सुरज उर्फ पाप्या जाधव हा कासेवाडीतील एका पतसंस्थे जवळ उभा आहे .
मिळाल्याने माहिती नुसार सुरज उर्फ पाप्या रमेश जाधव (वय 22 वर्ष रा.कासेवाडी ,पुणे ) यास ताब्यात घेण्यात आले.
तसेच पोलीस हवालदार अजय थोरात यांना मिळालेल्या बातमी नुसार सध्या पॅरोलवर असलेला रेकॉर्ड वरिल गुन्हेगार
रवी कोळी हा कोयता घेऊन कामगार तरुण मंडळा जवळ कासेवाडी पुणे येथे उभा असल्याबाबत
माहिती मिळाल्याने रवी मनोज कोळी (वय 22 वर्ष रा. कासेवाडी पुणे ) यास लोखंडी कोयत्यासह पकडण्यात आले.
तसेच पोलीस शिपाई तुषार माळवदकर यांना मिळालेल्या बातमी नुसार रेकॉर्ड वरिल गुन्हेगार आझिम शेख हा गुप्ती घेऊन 10 नंबर कॉलनी जवळ पार्किंग मध्ये कासेवाडी पुणे येथे उभा असल्याबाबत माहिती मिळाल्याने आझिम सलीम शेख (वय 23 वर्ष रा. कासेवाडी पुणे )
यास लोखंडी गुप्तीसह पकडण्यात आले असल्याने सदर आरोपी कडुन 1 कोयता व 1 गुप्ती जप्त करुन खडक पोलीस स्टेशन पुणे येथे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत .
व त्यांना पुढील तपासासाठी खडक पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.
सदर आरोपीवर जबरी चोरी, घरफोडी , चोरी , वाहनचोरी प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी गुन्हे शाखा पुणे शहरचे अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे , पोलीस उप आयुक्त , गुन्हे ,
श्रीनिवास घाडगे , सहायक पोलीस आयुक्त गुन्हे . १ सुरेन्द्र देशमुख यांच्या मार्गदशनाखाली युनिट – १ गुन्हे शाखा , पुणे शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव ,
युनिट – १ गुन्हे कडील पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड , सुनिल कुलकर्णी , पोलीस अंमलदार अजय थोरात ,
अमोल पवार , इम्रान शेख , अय्याज दडडीकर , तुषार माळवदकर , महेश बामगुडे, विजेसिंग वसावे ,सचिन जाधव , दत्ता सोनावणे , शशीकांत दरेकर यांनी केली असल्याची माहिती मिळाली.