पॅरोलवर बाहेर येऊन करत होता चोरी गुन्हे शाखेने केली अटक,
पॅरोलवर बाहेर येऊन करत होता चोरी गुन्हे शाखेने केली अटक,
पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : कोरोना संक्रमणाचा वाढता प्रभाव पाहून येरवडा कारागृहातील बऱ्याच आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. परंतु काही आरोपींकडून आजही गुन्हे केले जात आहेत.
असाच एक गुन्ह्याचा प्रकार समोर आला आहे. मध्यरात्री पायी जाणाऱ्या एखा तरुणाला चाकूचा धाक दाखवत लुटणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या पथकाने अटक केली आहे.
वेंकटेश दत्ता तगारे वय ३५ वर्षे रा. खडकी रेल्वे स्टेशन जवळ आणि सतीश गायकवाड वय २७ वर्षे रा. कामगार मैदान मुंढवा हे दोघेही येरवडा कारागृहातून पॅरोलवर सुटले असून दोघांविरोधात गंभीर गुन्हे दाखल आहेत.
पॅरोल बाहेर येऊन लिफ्ट देण्याचा बहाणा करून लुटीचे प्रकार करत असल्याचे समोर आले आहे. त्यांच्याकडून ७ मोबाईल व एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
वडगाव शेरी येथील राहणारे किरण शिंदे हे एक ऑगस्ट रोजी रात्री पायी जात होते त्यावेळी आरोपी हे दुचाकीवरून आले त्यांना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने काही अंतरावर घेऊन जात चाकू गळाला लावत लुटले याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट ४ हे करत असताना शिंदे यांनी दिलेल्या वर्णानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, उपनिरीक्षक विजय झंजाड हे आरोपींचा माग काढत असताना तांत्रिक विश्लेषणावरुन आरोपी खडकी परिसरात असल्याची माहिती मिळताच सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले.