Crime branch news.com provided the latest Marathi news, Marathi police news, latest Marathi news, Pune police news, crime branch news, crime news pune,
Online e pass काढुन देणा-या भांमट्यावर पोलीसांची कारवाई
Online e pass : पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : सद्या भारतात , महाराष्ट्रात कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे शासनाकडून लॉकडाऊन जाहीर केला
असून नागरिकांची गर्दी होऊ नये म्हणुन एका जिल्हयातुन दुस-या जिल्हयात व राज्यात ये जा करण्या करीता
शासनाच्या वतीने परवानगीने सदर लॉकडाऊन कालावधीमध्ये लोकांची असुविधा होवु नये म्हणुन
पुणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने अत्यावश्यक सेवा व अत्यावश्यक परिस्थितीत उदभवलेल्या नागरिकांना प्रवासाकरीता लागणारे ई-पास देण्यासाठी ई-पास सेवा सुरु करण्यात आली आहे.
सुरूवातीला १,५००/-रुपये व पास मंजुर झाल्यावर १,०००/-रुपये द्यावे लागतील तसेच सदरचे पैसे हे लगेच माझे वरील मोबाईल नंबरवर गुगल-पे द्वारे जमा करा, असे सांगितले.
सांगितल्या प्रमाणे महेश वाघमारे याच्या मोबाईल नं. ८६६८५०८८९८ यावर १,५००/- रुपये गुगल पे द्वारे जमा केले
आणि त्याने आधारकार्डची माहिती मागुन लगेचच पी. एच.सी. लोणीकाळभोर, मेडीकल ऑफीसर यांच्या नावाने संबधीत व्यक्तीची कोणतीही वैद्यकिय तपासणी न करता मेडीकल प्रमाणपत्र व्हॉट्सअप वर पाठविले.
यावरुन महेश नामदेव वाघमारे, २७ वर्षे याने पुणे पोलिस आयुक्त पुणे शहर यांनी जारी केलेल्या punepolice.in
या ई-सेवापासबाबत सुचना व आदेशाचे उल्लंघन करुन ई-पासची सुविधा ही कोणतीही आर्थिक फि आकारली नसताना
नागरिकांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाल्याने फिर्यादी यांनी त्याच्याविरुध्द सरकारतर्फे भा.दं. वि. कलम ४२०, ४६५, १८८ प्रमाणे फिर्याद हडपसर पोलीस ठाण्यात दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
असुन सदर गुन्हयात त्यास अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास दोन दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केले.
अपर पोलीस आयुक्त,गुन्हे,पुणे शहर अशोक मोराळे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, पुणे शहर बच्चनसिंह,
सहा. पोलीस आयुक्त गुन्हे पुणे शहर शिवाजी पवार यांचे मार्गदर्शनांखाली युनिट-५ चे प्रभारी अधिकारी डी.एल. चव्हाण,
सेवा कार्यप्रणालीचे प्रभारी अधिकारी शिल्पा चव्हाण, सह.पो.निरी संतोष तासगांवकर, पो.उप.निरी. शेंडगे व शरद देडगे, दया शेगर, आश्रुबा मोराळे यांनी ही कामगिरी केली.
Pingback: (pregnant women news) समाज माध्यमातील अफवेने गरोदर मातांच्या चिंतेत वाढ