३ हजाराची लाच घेताना पोलिसाला अॅन्टी करप्शने केली अटक,
अमरावती पोलीस दलात खळबळ,
पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : अमरावती शहरातील पोलीस शिपायास ३ हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकळून अटक केली आहे.
सुशील सुरेशराव गुल्हाणे वय ४० असे अटक केलेल्या पोलीसाचे नाव आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुशील गुल्हाणे हे अमरावती पोलीस दलात कार्यरत असून तक्रारदार महिलेचा जावई व त्यांचे मोठे भाऊ यांच्यावर धारणी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात रिपोर्ट न वाढवता सहकार्य करण्यासाठी सुशील गुल्हाने यांनी त्यांच्याकडे ४ हजार रुपयांची लाच मागितली.
त्यांना लाच द्यायची नसल्याने तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
त्याची पडताळणी केली असता लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सुशील गुल्हाणे यांना तडजोडी अंती ३ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे.