पेटीएम अपडेट करून देतो असे म्हणत २ लाखांना घातला गंडा
Paytm update fraud cases : सिमकार्ड फोरजी करण्याच्या बहाण्याने ही बँक खात्यातून १ लाख १९ हजार रुपये काढले
Paytm update fraud cases : पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : सिमकार्ड आणि पेटीएम केवायसी अपडेट करून देतो असे म्हणत पुण्यातील दोन महिलांची दोन लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.
वानवडी पोलिस ठाण्यात एका 36 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.
त्या तक्रारीनुसार ती महिला घरी असताना आयडिया कंपनीतून बोलत असल्याचे सांगत अमन वर्मा नावाच्या व्यक्तीने त्यांना फोन केला .
त्याने सिमकार्ड फोरजी करण्याच्या बहाण्याने त्यांना एक मेसेज पाठवून तो १२३४५ क्रमांकावर पाठवण्यास सांगितले.
यानंतर त्याने सिम कार्ड आणि फिर्यादीच्या आयसीआयसीआय बँकेच्या खात्यात एक्सेस स्वतःकडे घेतला.
यानंतर त्यांच्या बँक खात्यातून १ लाख १९ हजार रुपये काढून घेतले.