नो पार्किंगमधील वाहने उचलणा-या टोईंग वाल्यांकडून पुणेकरांची लूट?
नो पार्किंगमधील वाहने उचलणा-या टोईंग वाल्यांकडून पुणेकरांची लूट.?
आवाजावी आकारली जातेय रक्कम,
MH-४३-AJ- १७४० या चारचाकी वाहनात बसून विना पावती पोलीसांनी आकारली रक्कम,
पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : पुण्यातील टोईंग वाल्यांकडून नागरिकांना अरेरावीची भाषा वापरणे, आवाजावी रक्कम आकारणे, वाहनांचे नुकसान करणे, असे रोजचेच प्रकार घडत असल्याने आणि वरिष्ठांची डोकेदुखी वाढल्याने जुन्या टोईंग टेम्पो बंद करण्यात आली.
तर पारदर्शकता आणण्यासाठी पुणेकरांवर जास्त रक्कमेचे टोईंग चार्जेस लादण्यात आले. विदर्भ इन्फोटेक प्रा लि.या कंपनीला ठेकेदार पद्धतीने नो पार्किंगमधील वाहने उचलण्याचा ठेका देण्यात आला.
तेही CCTV कॅमेरेच्या निगराणीखाली. परंतु पारदर्शकता आणण्याचा फक्त आणि फक्त वाहतूक पोलिसांनी देखावाच केला आहे का.
विदर्भ इन्फोटेक प्रायव्हेट कंपनी कडील कामगारांना वाहतूक पोलिस हताशी धरुन पुणेकरांची लूट होत असताना पुणे पोलिस आयुक्त के व्यंकटेशम कारवाई करतील का? असा प्रश्न पुणेकरांकडून विचारला जात आहे.
हकीकत अशी की पुण्यातील एका सामाजिक कार्यकर्ते सादिक शेख यांची दुचाकी वाहन तुळशीबाग येथून नो पार्किंगमधून उचलून नेण्यात आली. सदरील वाहन अल्का चौकात( लाकडी पूल) नेऊन टोईंग वाल्यांनी ठेवली होती.
सामाजिक कार्यकर्ते सादिक शेख त्या ठिकाणी पोचताच MH०३ CD १२४५ टोईंग टेम्पो वर काम करणाऱ्या कामगारांना त्यांच्या दुचाकी वाहन संदर्भात विचारणा करताच त्यातील एकाने ७५०० ची मागणी केली.