Bogus doctor : पुणे महानगरपालिकेतील डॉक्टरांनी दिली फिर्याद,
Bogus doctor : पोलीस न्यूज 24 :
शहरात सध्या बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट राजरोसपणे पाह्यला मिळते.
मुळव्याध, भगंदर, व इतर आजारांवर छोटे मोठ्ठे क्लिनिक, दवाखाने उघडून १००% इलाज केला जातो.
असे अनेक प्रकारचे दावे केली जातात. परंतु ते कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता बिनधास्तपणे नागरिकांवर उपचार करताना दिसतात.
परंतु आपण ज्यांच्याकडे उपचार करतोय ते बोगस डॉक्टर आहे हे नागरिकांना कळणे ही अवघड आहे.
वाचा :तडीपार गुन्हेगारास गुन्हे शाखेने केली अटक,
पुणे महानगर पालिकेने बोगस डॉक्टर शोध मोहीम तिव्र करण्याची गरज आहे.
शासनाची मान्यता न घेता बिनधास्तपणे नागरिकांवर उपचार करणा-या डॉक्टराविरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्र या नावानेे संतोषनगर, गल्ली नं.२,
पीएमपीएमएल बस स्टॉप मागे ,जैन मंदिर रोड , कात्रज, पुणे येथे निसर्गोपचार केंद्र चालविले जात होते.
या संदर्भात पुणे महानगर पालिकेला माहिती होताच कारवाई करण्यात आली आहे.
वाचा : घरात घुसून चेकबुक चोरुन बँकेतुन रक्कम काढणाऱ्या चोरट्यास अटक,
निसर्गोपचार केंद्र चालविणाऱ्या डॉक्टरकडे चौकशी केली असता महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम सन १९६१ चे कलम ३३(१) अन्वये महाराष्ट्र वैद्यकीय परिषद,
महाराष्ट्र चिकित्सा परिषद,महाराष्ट्र भारतीय चिकीत्सा परिषद व महाराष्ट्र दंत वैद्य परिषद या चार पैकी कोणत्याही परिषदेकडे नोंदणी केलेली नाही.
महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम १९६१ चे कलम ३३ ( १)चे उल्लंघन करून,नागरीकांना अधिकृत वैद्यकीय व्यवसाय असल्याचे भासवुन,
उपचार करुन व स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता नागरिकांची फसवणुक केली आहे.
या संदर्भात डॉक्टर दिपक पखाले वैद्यकीय अधिकारी, परिमंडळ-क्र.३,
पुणे महानगरपालिका यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pingback: (bogus ration card) पुण्यात बोगस रेशनकार्ड बनविणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल,
Pingback: ( ICC Bank ) कारचा १ हप्ता चुकल्याने महिलेस आयसीसी बॅंकेतून शिवीगाळ,
Pingback: (counterfeit notes ) बँकेत बनावट नोटा जमा करून बँकेची केली फसवणूक,