घरफोडी व चोरी च्या प्रकरणात शिकलगरी टोळीतील गुन्हेगाराना अटक

Crime Branch News :शिकलगरी टोळीतील गुन्हेगाराना युनिट-३ कडून अटक

CRIME BRANCH UNIT 3 GHARPHODI  CHORI NEWS

Crime Branch News : Police news 24 : पुणे पोलीस आयुक्त,डॉ.के.व्यंकटेशन, व पुणे पोलीस शहर सह आयुक्त,

रविंद्र शिसवे यांनी पुणेशहरातील गुन्हेगारी समुळ नष्ट करण्यासाठी, व गुन्हेगारांवर वचक बसावा म्हणून तसेच घरफोडी चोरीचे गुन्हे घडू नयेत,

व दाखल गुन्हे उघडकीस आणावेत म्हणुन रोकार्डवरील आरोपीचा शोध घेऊन त्यांच्या विरुध्द कठोर कारवाई करण्याबाबत वेळोवेळी आदेश दिलेले आहे.

त्यानुसार कारवाई करण्यात येत आहे.दि.२३/०६/२०२० रोजी युनिट.३ गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेन्द्र मोकाशी यांना गुप्त बातमी मिळाली की,

शिकलगरी टोळीतील घरफोडी चोरी करणारा व घरफोडी चोरीच्या गुन्हयात फरार असलेला पोलीस रेकॉर्ड वरिल अट्टल गुन्हेगार रविसिंग कल्याणी (रा. रामटेकडी हडपसर पुणे )

व त्याचा साथीदार युवराज मोहिते (रा. सांगली ) हे दोघे फुगेवस्ती भोसरी येथे येणार आहेत.

त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेन्द्र मोकाशी यांनी त्यांची पोलीस अधिकारी / कर्मचारी यांची टिम तयार करुन फुगेवस्ती भोसरी येथे सापळा रचला होता,

त्या ठिकाणी रविसिंग कल्याणी व त्याचा साथीदार युवराज मोहिते हे आल्याची खात्री होताच त्यांना पकडण्यात आले.

नवले पुलाजवळील विचित्र अपघातात सात वाहनांचे नुकसान

रविसिंग शामसिंग कल्याणी (रा. कोठारी व्हिल्स शोरुम मागे रामटेकडी हडपसर पुणे) याने व युवराज वसंत मोहिते (रा.मु. पो तोंडोळी, ता.कडेगाव,जि.सांगली )

यांनी त्यांचे साथीदार तिलकसिंग गब्बरसिंग टाक व आजीनाथ लक्ष्मण गायकवाड यांनी दत्तवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील साईबाबा वसाहत येथे घरफोडी चोरी केली होती,

त्याबाबत दत्तवाडी पो.स्टे येथे ४५४,४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्हयात आरोपींना अटक करण्यात आली आहे.

सदर आरोपी हे दि.०२/०७/२०२० रोजी पर्यंत पोलीस कस्टडीमध्ये असून तपासामध्ये आरोपींनी वारजे माळवाडी पो.स्टे, दत्तवाडी,

अलंकार व स्वारगेट पो.स्टे च्या हद्दीत घरफोडी चोरीचे व तसेच खडक पो.स्टे च्या हद्दीत वाहन चोरीचे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

🖕 Click Here

त्यांच्याकडून एक मारुती सुझुकी इको कार, गुन्हा करसाण्याठी वापरलेली बजाज पल्सर २२० मोटार सायकल

व सोन्या,चांदीचे दागिने तसेच घरफोडीची साधने असा सर्व मिळून १०,२५,०००/- रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे.

सदरील गुन्हयाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेन्द्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण अडागळे हे करीत आहेत.

रेशनिंग किट मधील तेल चोरी संदर्भात पोलीसात तक्रार दाखल

आरोपी रविसिंग कल्याणी हा पाच घरफोडीच्या व हडपसर येथील दरोडयाच्या तयारीतील गुन्हयातील फरार आरोपी आहे.

त्याच्या विरुध्द यापूर्वी एकूण ३१ घरफोडी व वाहन चोरीचे गुन्हे तसेच तिलकसिंग याच्या विरुध्द यापुर्वी एकूण ३५ घरफोडी,

वाहनचोरी,दरोडा व शस्त्र बाळगणे असे गुन्हे दाखल आहेत.

यातील आरोपी युवराज मोहीते याने कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मु.पो.बनवडी ता.कराड जिल्हा सातारा

येथे राहणारा त्यांचा मित्र नामे अभिजित तुळशीदास पवार याच्या मानेवर सत्तूरने वार करुन त्याचा खुन केला असल्याचे उघडकीस आले आहे.

सदरील प्रकरणी कराड शहर पोलीस ठाणे येथे भा.दं.वि.कलम ३०२,४५२ प्रमाणे गुन्हा दाखल असून

सदर गुन्हा त्याने व त्याचा साथीदार अमोल पोळ असे दोघांनी केला असल्याचे उघडकीस आले असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेन्द्र मोकाशी, सहा पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे, पोलीस उप निरीक्षक किरण अडागळे,

स्टाफ किशोर शिंदे, दत्तात्रय गरुड, दिपक मते,अनिल शिंदे,राहूल घाडगे, संतोष क्षीरसागर, प्रविण तापकिर,

रोहिदास लवांडे,मेहबुब मोकाशी,गजानन गाणबोटे,रामदास गोणते, अतुल साठे, संदीप राठोड, संदीप तळेकर,

विल्सन डिसोझा,नितीन रावळ,सचिन गायकवाड, कैलास साळुके कल्पेश बनसोडे, सुजित पवार, यांच्या पथकाने केली.

🖕 Click Here

4 thoughts on “घरफोडी व चोरी च्या प्रकरणात शिकलगरी टोळीतील गुन्हेगाराना अटक

Comments are closed.