सायबर क्राईम विषयावर राष्ट्रीय वेबिनार संपन्न,

मोहोळ सायबर क्राईम विषयावर राष्ट्रीय वेबिनार संपन्न..


पोलीस महानिरीक्षक (आयपीएस) यशस्वी यादव यांची उपस्थिती..
 
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे  मामासाहेब मोहोळ महाविद्यालयाच्या वतीने

या वेबिनार मध्ये देशातील विविधराज्यांमधून २५४३ जणांनी सहभाग

एकदिवसीय सायबर क्राईम या विषयावर वेबणारचे आयोजन करण्यात आले होते.

🖕 Click Here

यादव(आयपीएस) महानिरीक्षक, सायबर सुरक्षा, महाराष्ट्र राज्य, मुंबई, डॉ. शिवाजी

नोंदविला असून ३३३९ जणांनी नोंदणी केली आहे.या वेळी श्री। यशस्वी

पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त, सायबर गुन्हे, गुन्हे शाखा, पुणे शहर,  श्री। संदिप

गादिया सायबर गुन्हे अन्वेषण तज्ञ, पुणे, अॅड. संदिप कदम, मानद

सचिव, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ तथा अधिसभा सदस्य सावित्रीबाई फुले पुणे

विद्यापीठ, अँड.मोहनराव देशमुख, खजिनदार, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ,

आत्माराम जाधव, सहसचिव, प्रशासन, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ. पुणे, प्राचार्य

डॉ. बालकृष्ण झावरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.वेबिनारच्या प्रस्ताविकात

“इंटरनेटच्या सकारात्मक वापराबरोबरच दुष्प्रवृत्तींद्वारे केला जाणारा दुरुपयोग

सर्वसामान्यांचे जीवन, राष्ट्राची सुव्यवस्था, अर्थव्यवस्था डळमळीत करू

शकतो. इंटरनेटद्वारे केल्या जाणार्‍या गैरवापरास ’सायबर क्राईम’ म्हटले जाते.

या सायबर क्राईमची व्याप्ती, त्याबाबत घ्यावयाची सुरक्षितता अशा अनेक

पैलूंवर  या वेबिनारमधून आपल्याला निश्चितच फायदेशीर ठरेल” असे प्राचार्य व वेबिनारचे आयोजक, डॉ. बाळकृष्ण झावरे

यांनी सांगितले.देशातील आर्थिक विषमतेची दरी या सिलिकॉन व्हॅलीमुळे

भरून निघत आहे. मात्र, या ताकदवान माध्यमाचा सकारात्मक वापर होणे गरजेचे

आहे. याबाबत व्यक्तिसापेक्ष जागरूकता बाळगली पाहिजे. फेसबुक या प्रचंड

लोकप्रिय वेबसाईटचा निर्माता मार्क झुकेरबर्ग याचे वेब पेजसुद्धा हॅक करण्यात

आले होते. सायबर क्राईममधील आजची व उद्याची आव्हाने सायबर क्राईम रोज

नव्या स्वरूपात, नव्या आकारात व नव्या शस्त्रासह पुढे येत आहे. तज्ज्ञांच्या

निष्कर्षानुसार आज डेटा थेप्ट, सायबर स्टॉकिंग, हॅकिंग, व्हायरसअटॅक, पोर्नोग्राफी

ही महत्त्वाची सायबर आव्हाने तर आहेतच. त्याशिवाय सॉफ्टवेअर पायरसी, फिशिंग, स्पुफिंग, स्टॉकिंग, क्रेडिट

कार्ड फ्रॉड, थे्रटनिंग, ड्रग्ज ट्रॅफिकिंग, सायबर टेररिझमअशा व्यापक

स्वरूपातदेखील सायबर क्राईमपुढे आला आहे. आज भारतात हॅकिंग, पोर्नोग्राफी व

डेटा थेप्ट हे अशा स्वरूपाचे गुन्हे आयटी सेक्शनखाली नोंदविले जातात. तथापि

यात व्यापकता येऊन सायबर क्राईमखाली येणारे सर्व गुन्हे आयटी सेक्शनखाली नोंद

होणे महत्त्वपूर्ण ठरेल. असे मत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव अँड.संदीप

कदम यांनी मत मांडले.पहिल्या सत्रात यशस्वी यादव (आयपीएस)

महानिरीक्षक, सायबर सुरक्षा, महाराष्ट्र राज्य, मुंबई,यांनी “”आपण ‘इन्फॉरमेशन

युगात’ राहतो. माहिती आजकाल अतिशय सहजपणे व सर्वांना उपलब्ध आहे.

संगणक, मोबाईल फोन, डिजिटल कॅमेरे आणि इतर इलेक्ट्रॉनिक गॅझेट आपल्या  दैनंदिन जीवनाचा अविभाज्य

भाग बनले आहेत. दररोजच्या जीवनातील विविध पैलूंमधील तंत्रज्ञानाचा आणि

इंटरनेटचा वाढता वापर, यामुळे सायबर अपराधी बऱ्याच मोठ्या प्रमाणावर

नागरिकांवर हल्ला करत आहेत. हे अपराध्यांसाठी एका जागी बसून करणे

सोपे आहे याचे एक कारण असेही आहे की माहितीच्या देवघेवीचे हे तंत्रज्ञान वापरतांना

ते करणाऱ्या व्यक्ती या बरेचदा पूर्णपणे अनोळखी असतात, यात काही सीमारेषा

नसतात, म्हणजेच नायजेरियात बसून कोणी तुमच्याशी संवाद साधेल पण

भासवेल की हा संवाद अमेरिकेतून होतोय. हे एक साधे सोपे समजावे असे उदाहरण

झाले पण सांगायचा मुद्दा हाच की यातले बरेच गुन्हे हे अनोळखीपणाचा फायदा

घेऊन केले जातात. आज जगातील प्रत्येक क्षेत्र, व्यवसाय, इंटरनेटने प्रभावित झालेला

दिसतो. इंटरनेटच्या या मायाजालाचा हॅकर अतिशय क्लुप्तीने गैरवापर करतात. मध्यंतरी रशियाने जॉर्जियावर हल्ला करून

हा देश आपल्या ताब्यात घेतला होता. मात्र, या हल्ल्याआधी रशियन

इंटेलिजन्सच्या हॅकर्सने जॉर्जियाच्या संगणक प्रणाली, दूरसंचार यंत्रणा, प्रमुख

सर्व्हर हॅक करून दळणवळण यंत्रणा या सायबर हल्ले करून आपल्या नियंत्रणाखाली आणल्यामुळे जॉर्जियावर

प्रत्यक्ष हल्ला करणे रशियाला अगदी सोपे झाले. इराणची न्यूक्लियर वेपन

सिस्टिममध्ये (क्षेपणास्त्र यंत्रणा) ‘स्टक्स नेट’ हा व्हायरस / मॅलवेअर डाऊनलोड

करण्याचा प्रयत्न झाला. अल कायदाच्या हॅकर्सचा यात हात असल्याचा संशय आहे.

तर अमेरिकेतील एका १२ वर्षीय मुलाने ‘नासा’ या अमेरिकेन अंतराळ संशोधन

संस्थेतील सॅटेलाइट ची दिशा हॅकिंगद्वारे बदलली होती” असे सांगितले.
 
पुणे सायबर क्राईम सेल आणि क्राइम ब्रांच  चे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ शिवाजी

पवार यांनी आपले विचार मांडताना “
 “सायबर गुन्हे विशेषकरून हॅकिंग, लैंगिक

चित्रण इत्यादी स्वरूपात घडताना दिसतात. याशिवाय खासगी किंवा गोपनीय माहिती चोरणे, फोडणे आदी प्रकारदेखील

सायबर गुन्ह्यांमध्ये मोडतात. सोशल नेटवर्कींग द्वारे धमक्या देणे, आर्थिक

गुन्हेगारी, मुलांविरूद्ध गुन्हे आणि इ-मेल द्वारे फसवणूक हे सुद्धा सायबर

गुन्हेगारीच्या कक्षेत येते.” असे सांगितले. तसेच पुणे शहरातील सायबर गुन्ह्यांच्या

आकडेवारी आणि सध्याच्या सायबर गुन्ह्याचा ट्रेंड काय आहे ह्याबद्दद्ल अत्यंत महत्वाची माहिती दिली.
 
सायबर क्राईम इनव्हेस्टीगेशन एक्स्पर्ट श्री. संदीप गादिया यांनी सायबर वेगवेगळे

सायबर गुन्हे काय आहेत, टे कसे होतात ह्या बद्दल विस्तृत माहिती दिली. सायबर

क्राइम, हॅकिंग, सायबर फिशिंग व त्याचे वेगवेगळे प्रकार, मोबाईल क्राइम, डेबिट

आणि क्रेडीटकार्डच्या संदर्भातील होणारे सायबर फ्रॉड तसेच  सध्याच्या कोव्हीड१९ /

कोरोनाच्या काळात काय गुन्हे घडत आहेत ह्याबद्दद्ल वास्तविक जीवनात घडणाऱ्या

सायबर गुन्ह्यांच्या उदाहरणसह अत्यंत सोप्या भाषेत सांगितले. तसेच सायबर

गुन्ह्यांच्या बाबतीतील सायबर सुरक्षेबाबत अत्यंत महत्वाच्या टिप्स सांगितल्या त्या खालीलप्रमाणे:
 
ऑनलाईन खरेदी करताना संगणकाची घ्यावयाची काळजी:

 1. आर्थिक व्यवहारासाठी कोणतीही सार्वजनिक / विनामूल्य वाय-फाय वापरू नका.
 2. एक चांगला, अद्ययावत आणि परवानाकृत [सशुल्क] अँटीव्हायरस वापरा.
 3. सायबर-हल्ले टाळण्यासाठी आपल्या संगणकावर एक चांगला फायरवॉल स्थापित करा.
 4. आपल्या वेब ब्राउझरमध्ये अँटी फिशिंग फिल्टर स्थापित करा. इंटरनेट एक्सप्लोररमध्ये स्मार्टस्क्रीन  फिल्टर सारखे विविध फिशिंग फिल्टर्स आहेत, जे आपल्याला बनावट वेबसाइट आढळल्यास आपल्याला चेतावणी देऊन फिशिंग साइटपासून आपले रक्षण करण्यास मदत करते.
 5. आपल्या आर्थिक व्यवहाराच्या बँकेच्या स्टेटमेंट वर लक्ष ठेवा.
 6. आपल्या ब्राउझरमध्ये कोणतेही दुर्भावनापूर्ण अ‍ॅप / प्लगइन / अ‍ॅड-ऑन नसल्याचे सुनिश्चित करा.
  ७. सर्व ऑनलाईन सेवांना कठीण आणि गुंतागुंतीचा पासवर्ड द्या. ते नियमितपणे बदलत रहा.
   
  इ-कॉमर्स / बँकिंग/  वॉलेट अॅपचा करताना घ्यावयाची काळजी:
 7. अधिकृत स्टोअर / वेबसाइटवरून अ‍ॅप्स डाऊनलोड करा.
 8. कोणतेही अ‍ॅप्स करण्यापूर्वी डाऊनलोड करताना विचारलेल्या परवानग्या तपासा. अनावश्यक परवानग्या विचारत असलेले अ‍ॅप्स वापरणे टाळा.
 9. आपल्या सेल फोनमध्ये एक चांगला, अद्ययावत आणि परवानाकृत [सशुल्क] अँटीव्हायरस अ‍ॅप वापरा.
  ४. मोबाईल अ‍ॅपची वैधता / विश्वासार्हता तपासा.
 10. मोबाइल अॅप्स / फर्मवेअर नियमितपणे अपडेट करा.
  ६. जर ग्राहक सेवा कार्यकारी अधिकारी आपल्याला क्विक सपोर्ट [क्यूएस] / टीमव्यूइव्हर किंवा एनीडेस्क यासारखे रिमोट अॅक्सेस सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यास सांगत असेल तर असे अॅप्स डाऊनलोड करू नका, कारण हे अॅप्स फसवणूक करणार्‍यास आपल्या सेल फोनमध्ये प्रवेश मिळवून देण्यास सक्षम करतात.
 11. उपयोगानंतर सर्व ईकॉमर्स, वॉलेट आणि बँकिंग अ‍ॅप्स लॉग आउट करा.
  ८. क्यूआर कोडद्वारे व्यवहार केल्यास, विनंतीचे प्रकार तपासा [निधी पाठवा / प्राप्त करा] केले. व्यवहाराची विनंती स्वीकारताना फ्रॉडस्टर हा निधी वळवू शकतात.
 12. आपल्या कार्डाचा तपशील कोणत्याही ईकॉमर्स अ‍ॅपमध्ये साठवू नका.
   
  डेबिट / क्रेडीट कार्डच्या संदर्भातील सुरक्षा:
  १. आपल्या कार्डचे पिन अंदाज लावण्यायोग्य ठेवू नका.
  २. आपले डेबिट / क्रेडिट कार्ड तपशील [कार्ड क्रमांक, पिन, ओटीपी] कोणासही सांगू नका. तसेच आपला पिन नियमित कालांतराने बदला.
  ३. सीपीपी / वनअसिस्ट सारखे कार्ड विमाच्या सेवा घ्या.
  ४. आपल्याकडे एकापेक्षा जास्त कार्डे असल्यास, सर्व कार्डांना समान पिन देऊ नका.
  ५. आपल्या उपस्थितीत नेहमीच कार्ड व्यवहारास अनुमती द्या.
  ६. कार्ड क्रमांक आणि पिन टाईप करताना नेहमी आपला हात झाकून ठेवा.
   
   
  जर तुमच्या बरोबर सायबर क्राईम घडला तर काय कराल?
   
  १. सायबर क्राइम सेल / सायबर पोलिस ठाण्याशी त्वरित संपर्क साधा.
  २. तुमच्या कार्ड जारी करणार्‍या बँकेत त्वरित संपर्क साधा आणि तो व्यवहार ब्लॉक करा आणि कार्डही ब्लॉक करा.
  ३. ईकॉमर्स वेबसाइटच्या ग्राहक कार्डावर संपर्क साधा आणि त्यांना व्यवहार थांबवण्यासाठी आणि टे अकाऊंट गोठवण्याची विनंती करा.
  ४.तुमच्या कार्डाचा / खात्याचा पासवर्ड किंवा पिन क्रमांक बदला.
  ५. आपल्या सायबर विमा कंपनीला माहिती द्या.
   
   
  अशी अत्यंत महत्वाची आणि विस्तृत माहिती सायबर क्राईम इनव्हेस्टीगेशन एक्स्पर्ट श्री. संदीप गादिया यांनी दिली.
   
  अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करताना खजिनदार, ऍड मोहनराव देशमुख यांनी “इंटरनेट हे माहितीचे महाजाल आहे आणि निश्चितच ते समाजासाठी एक वरदानही आहे पण त्याचा वापर तेवढा आपण सजगतेने केला पाहिजे तरच आपण त्यातील इंटरनेट बँकिंग सारख्या साधनांचा चांगला फायदा आणि सोशल नेटवर्कींगचा सुद्धा सकारात्मक उपयोग करू शकतो.ऑनलाईन व्यवहार करताना आपली एखादी चुक फार महागात पडू शकते. जावू दे रे काही होत नाही… असं म्हणून आपण दुर्लक्ष केलं की झालंच… तुमची शिकार होणारचं”  असे सांगितले.  या राष्ट्रीय वेबिनार चे मुख्य संयोजक प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे, , सह-संयोजक  प्रा.अनिल दाहोत्रे ,क्रीडा संचालक,. डॉ.योगेश पवार, शारीरिक संचालक, डॉ. शिवाजी शिंदे
   प्रा अशोक शेळके, प्रा तानाजी जाधव, अधीक्षक हरी सोलंकी अधिक्षक,  मामासाहेब मोहोळ महाविद्यालय यांनी तांत्रिक बाबी सांभाळून वेबिनारचे आयोजन केले. वेबिनारचे सूत्रसंचालन डॉ.सपना राणे यांनी केले तर आभार डॉ.श्रीनिवास इप्पलल्ली यांनी मानले.संस्थेचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार, उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, उपसचिव एल एम पवार यांनी वेबिनारचे विशेष कौतुक केले. वेबिनार घेण्याचा उद्देश व्यक्त करीत घेण्याचा कालावधी विद्यार्थी, शिक्षक व पालक यांना फायदेशीर असल्याचे सांगितले.

🖕 Click Here

One thought on “सायबर क्राईम विषयावर राष्ट्रीय वेबिनार संपन्न,

Comments are closed.