ज्येष्ठ महीला पत्रकार निशा पाटील यांनी केली आत्महत्या

ज्येष्ठ महिला पत्रकार निशा पाटील यांचे दुर्दैवी निधन (journalist suicide)

senior-woman-journalist-nisha-patil-suicide

Police News 24 : (journalist suicide) (दि.०१) – पिंपरी चिंचवड येथिल महिला पत्रकार संघाच्या माजी अध्यक्ष आणि दैनिक प्रभातच्या ज्येष्ठ पत्रकार निशा पाटील -पिसे

यांनी काल रात्री नऊच्या दरम्यान नेहरूनगर येथे त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

पाटिल हे अत्यंत प्रामाणिक कष्टाळू व अभ्यासू पत्रकार म्हणून ओळखल्या जात.

दैनिक केसरीतून निशा पाटील यांनी पत्रकारितेच्या कारकीर्दीस सुरूवात केली होती.

”लोकसत्ता” च्या ‘पिंपरी-चिंचवड’ अंतरंग पुरवणीसाठीही त्या नियमित लेखन करत होते

‘एमपीसी न्यूज’ मध्ये त्यांनी दीर्घकाळ पत्रकारिता केली.

एमपीसी न्यूज च्या मुख्य वार्ताहर पदाची जबाबदारी ही त्यांनी उत्तमपणे सांभाळली होती.

हेपण वाचा: एस.टी मधून प्रवास करणाऱ्या महिलेचे सोन्याचे नेकलेस चोरी

पुढे ‘पीसीबी टुडे’ ची संपादक पदाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती,

शेवटी दैनिक ‘प्रभात’ मध्ये उपसंपादक म्हणून नीशा पाटील-पिसे कार्यरत होत्या.

काल रात्री पावणेनऊ वाजता त्या कार्यालयातून घरी गेल्या,

त्यानंतर रात्री उशिरा त्यांनी खोलीचा दरवाजा आतून बंद करून गळफास घेतला.

या प्रकाराबाबत माहिती मिळताच पोलिसानी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून मृतदेह यशवंतराव चव्हाण रुग्णालयात पाठविले.

आज सकाळी शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

🖕 Click Here

सदरील प्रकरणी निशा पाटील -पिसे यांचे बंधू महेश शिंगोटे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कौटुंबिक वादातून आलेल्या नैराश्यातून निशा यांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

पिंपरी पोलिसांनी निशा यांचे पती प्रशांत पांडुरंग -पिसे यास ताब्यात घेतले आहे.

निशा यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली असून पिंपरी पोलिस अधिक तपास करत आहेत.

आज शुक्रवारी दि.(01) सकाळी अकरा वाजता त्यांच्या मूळ गावी उंब्रज नंबर 1 तालुका जुन्नर येथे नीशा पाटील-पिसेंचा अंत्यविधी करण्यात येणार आहे.

इतर बातमी : व्हिडिओ गेम व लॉटरी सेंटरवर पोलिसांचा छापा

pune police: स्वस्तिक ऑनलाईन lottery center व video games द्वारे लॉटरी खेळायला लावून नागरिकांची फसवणूक केली जात आहे.

सदरील घटना २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता शिवगंगा कॉम्प्लेक्स, सोमजी बस स्टॉप कोंढवा येथे घडली आहे.

यात संदीप कहर (वय ३१, रा. धनकवडी), लखन पंडोरे (वय २३, रा. सह्याद्रीनगर), विजयकुमार जोडतले (वय २८, रा. कात्रज), दत्तात्रय घुले (वय ३०, रा वडगाव-बुद्रुक),

गोविंद देशपांडे (वय ३१, रा. कोंढवा), नंदलाल कहार (वय ३१, रा. धनकवडी) यांना अटक करण्यात आली असून,

जुगार खेळणारे ८ जणही सहभागी आहेत. दुकानाच्या मालकाला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. अधिक वाचा

🖕 Click Here

2 thoughts on “ज्येष्ठ महीला पत्रकार निशा पाटील यांनी केली आत्महत्या

Comments are closed.