शासकीय पिवळा दिवा व गर्हमेंट ऑफ इंडिया असे नाव वापरून केली लाखोंची फसवणूक.
Government yellow light : फिर्यादी कडून रोख व आरटीजीएस एनईएफटीद्वारे एकूण १२,०६,०००/ रूपये घेतले
Government yellow light : पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : सध्या शासकीय नावांचा व लोगोंचा वापर सरासर वाढला आहे.
तसेच संघटना, संस्थांचे नावे हे एक सारख्या वाटत असल्याने नागरिकांच्या फसवणूकीत वाढ होत चालली आहे.
तर आयआरएस असल्याचे भासवून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
या संदर्भात योगेश वाल्हे,वय-४२ रा. भाऊ पाटिल रोड , पुणे यांनी फिर्याद दिली आहे.वाल्हे यांचे मंगलम चेंबर्स, अभुदय बँके जवळ,पौड रोड कोथरुड पुणे
येथे ॲक्युपंक्चर क्लिनिक मध्ये एकजण आयआरएस अधिकारी असल्याचे खोटे सांगून अधिकारी म्हणून स्वतःचा फोटो व त्यावर नाव लिहून,
खोटे बनावट आयकार्ड तयार असलेले सरकारी गणवेश घालून खाजगी पांढ-या रंगाची चारचाकी वाहनास शासकीय पिवळा दिवा आणि गर्हमेंट ऑफ इंडिया असे नाव लिहिलेले वाहन वापरत होता.