Crime branch news.com provided the latest Marathi news, Marathi police news, latest Marathi news, Pune police news, crime branch news, crime news pune,
उच्चभ्रू सोसायटीमधील तसेच रस्त्यावरील ये – जा करणा-या जेष्ठ महिलांवर पाळत ठेवुन त्यांचे मंगळसुत्र खेचुन करत होते चोरी.
(Swiggy and Zomato Delivery boy arrested) crime branch news प्रतिनिधी :
झोमॅटो व स्वीगी कंपनीची पार्सल डिलेव्हरी करणारे कर्मचारी ज्येष्ठ महिलांचे मंगळसूत्र
व इतर प्रकारची चोरी करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर पोलीसांनी कर्मचाऱ्यांना बेड्या ठोकल्या आहेत.
तर त्यांच्याकडून १ लाख ९७ हजारांचा मुद्देमाल केला जप्त करण्यात आला आहे.
हकीकत अशी की हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत १६ जून रोजी दुपारी महिला फिर्यादी भारती विठ्ठल भाडळे वय ६० वर्षे राहणार ऊरळी देवाची साने गुरुजी मार्ग ता.हवेली जि.पुणे
हे निर्मल टाऊनशिप काळेपडळ हडपसर,
यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र दोन इसमांनी जबरदस्तीने हिसका मारुन चोरुन नेले बाबत हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
विजय जगन्नाथ पोसा वय २२ वर्षे धंदा स्वीगी डिलेव्हरी बॉय रा. लेन नंबर- ४ तुळजाभवानीनगर खराडी पुणे,
साहिल अनिल गायकवाड वय २२ वर्षे धंदा जिम हाऊसकिपर सोलापुरर . मु.पो. सावरखेड, जय हनुमान तरुण मंडळाजवळ,
ता.सोलापुर यांना ताब्यात घेवूनत्यांचेकडे तपास केला असता आरोपी आकाश जाधव याने सांगितले
१६ जून रोजी दुपारी मी व माझे दोन साथीदार असे तिघेजण
एच.एफ.डिलक्स मोटर सायकलवरुन झोमेटोची डिलेव्हरी देण्यासाठी निर्मल टाऊनशिपमध्ये गेलो होतो.
डिलेव्हरी देवुन बाहेर आलो तेंव्हा सदर सोसायटी मधून एक महिला बाहेर आली.पाठोपाठठ जावुन त्याच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र जबरदस्तीने ओढून दुचाकी गाडीवर निघून गेलो असल्यासांगीतले.
तसेच दाखल गुन्हा केल्यानंतर आत्मविश्वास वाढल्याने त्यांनी १९ जून रोजी अशाच प्रकारे चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत
दुपारच्या वेळेस महिलेच्या गळ्यातील जबरस्तीने मंगळसुत्र चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
तीन्ही आरोपींना अटक करण्यात आली असुन दाखल गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही नम्रता पाटील, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५ यांचे सुचना व मागदर्शनाखाली कल्याणराव विधाते सहाय्यक पोलीस आयुक्त,
बाळकृष्ण कदम वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी प्रशंसनीय कामगिरी केली आहे.