पुण्यातील एका फायनान्स कंपनीच्या स्वच्छतागृहात कॅमेरा लावण्यात आल्याने खळबळ,
गुन्हा दाखल होताच तरुण झाला फरार,
पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : सीसीटीव्ही कॅमेरा जेवळा सुरक्षेसाठी चांगला असला तरी त्याचे आता काही दुष्परिणाम दिसू लागले आहेत.
काहिजण याचा चुकीचा वापर करत असल्याचे समोर येत आहे. पुण्या सारख्या शहरामध्ये एका फायनान्सच्या ऑफिसमध्ये महिलांच्या स्वच्छतागृहात छुप्या पद्धतीने कॅमेरा लावून चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.
ऑफिसमधील एका तरुणाने हा प्रकार केला असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्वेश ललितकुमार कोसे वय ३४, रा. राकुनाल आयकॉन, पिंपळे सौदागर असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर विवेक विनयकुमार शेखर वय ३७, रा.वाकड यांनी फिर्याद दिली.
कोथरूड येथे हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनचे ऑफिस आहे. ऑफिसमध्ये महिला कर्मचारीही कामाला आहेत. २ सप्टेंबरला महिला स्वच्छतागृहाचा मुख्य दरवाजा बराच वेळ बंद असल्याचे एका महिलेच्या निदर्शनास आले.
त्यावेळी ऑफिसमधील त्यांचा सहकारी अन्वेश हा स्वच्छतागृहातून बाहेर आल्याचे तरुणीला दिसले. तिने तत्काळ सुरक्षा रक्षकाला बोलावून स्वच्छतागृहाची तपासणी केली.