बहिणीच्या मुलीलाच मावशी दाखवत होते पॉर्न व्हिडिओ
Porn video News : कोंढवा परिसरातील घटना
Porn video News : पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : पुणे : विद्येचे माहेर घर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे.
आपल्या बहिणीच्या मुलीला तिच्या प्रियकराच्या मदतीने बळजबरीने पोर्न व्हिडिओ दाखवल्याप्रकरणी एका मावशीला अटक करण्यात आली आहे.
आरोपी महिलेच्या प्रियकरालाही अटक केली आहे. लॉकडाउनच्या काळात पुण्यातील कोंढवा परिसरात ही घटना घडली.
एप्रिल महिन्यात लॉकडाउन लागू झाल्यामुळे पीडित अल्पवयीन मुलीला तिच्या आईने आपल्या बहिणीकडे राहण्यासाठी सोडले होते.
या काळात आरोपी महिलेनं आपल्या बहिणीच्या मुलीलाच जबरदस्तीने पोर्न व्हिडिओ दाखवले होते.
आपल्या घरी परतल्यानंतर पीडित मुलीने सगळी हकीकत आपल्या आईला सांगितली. आपल्या बहिणीचे असा प्रकार केल्यामुळे तिला जबर धक्का बसला.
Pingback: ( Murder of a minor ) किरकोळ कारणावरून अल्पवयीन मुलाचा खून
Pingback: (social media) एकतर्फी प्रेमातून उकळली १४ हजाराची खंडणी
Pingback: (Female vice president) शाळेतील महिला उपाध्यक्षा विरोधात गुन्हा दाखल