Accused of murder arrested : तपास पथकातील पोलिस कर्मचारी अझीम शेख यांची उत्तम कामगिरी
Accused of murder arrested : पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी :
पुणे :- पिसोळी येथील श्री बालाजी गॅरेज च्या बाहेर 26 सप्टेबर रोजी एका तरुणाचा निघ्रून खून करण्यात आला होता .
त्याबद्ल श्री बालाजी गॅरेज च्या मालकाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली
26 सप्टेबर रोजी दुपारी 03:30 वा. च्या सुमारास त्यांच्या ओळखीचा सागर दादा आवताडे रा.अवताडे वाडी ता.हवेली जि.पुणे
याची दुचाकी गाडी दुरुस्त करत असताना सागर अवताडे हा गॅरेज च्या बाहेर बसला होता .
त्या वेळी एक कार गॅरेज समोर थांबली त्यातून तीन अनोळखी इसम हातात लांब धारदार हत्यारे घेउन खाली उतरले,
व सागर अवताडे याच्या जवळ आले व तिघांनी सागर अवताडे याला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्या डोक्यामागे ,
व अंगावर इतरत्र त्यांच्या कडील हत्यारांनी सपासप वार करून त्याला गंभीर जखमी करून जीवे ठार मारले,
अशी तक्रार दिल्याने अनोळखी तीन आरोपींवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा रजि नं. 1058/2020 भा.द.वि.कलम 302 ,
307 ,34 सह भरतीय हत्यार कायदा कलम 4(25). महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1), 135प्रमाणे वरिल प्रमाणे गुन्हा दाखल केला.
दाखल गुन्ह्याचा तपास चालू असताना बातमीदार यांच्या मार्फतीने पोलिस.शिपाई.8475 आझीम शेख यांना माहिती मिळाली की,
यातील आरोपी नामे नारायण ऊर्फ माया विश्वनाथ पुरी ,वय 25वर्ष रा.स.नं.312 गल्ली नं.3, पेट्रोल पंपाजवळ ,सार्थक लॉज समोर,
सुंदर सोसायटी, हांडेवाडी ,पुणे मुळ गाव – ब्राम्हणगाव , मारुती मंदीरा शेजारी , ता.जिंतुर जि.परभणी.
2) जूनेद नसीर शेख , वय 20 वर्षे , जन्मतारीख 07/10/1999 , धंदा डिलीव्हरी बॉय , रा.सय्यदनगर ,गल्ली नं.19,
अश्रफ मस्जीद समोर, हडपसर,पुणे मुळ गाव – बुद्धनगर , इकबाल शाळे जवळ ता.व जि.लातूर याची नावे तपासात निष्पन्न झाली,
व यातील आरोपी हे महम्मदवाडी, कृष्णानगर पुणे येथे लपुन बसले असल्याची माहिती पोलिस नाइक.पांडुळे ,
पोलिस शिपाई 8475 आझीम शेख व पोलिस शिपाई 8440 दिपक क्षीरसागर याना माहिती मिळाल्याने सदरमाहिती तत्काळ वरिष्ठांना कळविली.
वरिष्टांची परवानगी घेऊन पोलीस उपनिरीक्षक शिंदे ,सपोफौ इक्बाल शेख , सपोफौ सुरेश भापकर पो.ना 6452 पृथ्वीराज पांडुळे,
व वरील आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या कडे अधिक विचारपुस केली असता वरील गुन्हा पूर्व वैम्यनस्यातुन केला असल्याचे सांगितले.
Pingback: (Murder of a criminal) भवानी पेठेतील सराईत गुन्हेगाराचा कोंढव्यात खुन