Murder of a minor : लोहियानगर येथील अल्पवयीन मुलाचा खून
Murder of a minor : पोलीस न्यूज 24 : लॉकडाऊन पूर्वी झालेल्या किरकोळ भांडणाचा राग मनात ठेऊन लोहियानगर येथील अल्पवयीन मुलाचा 25 ऑगस्ट रोजी खून करण्यात आला.
मिळालेल्या माहिती नुसार मृत अयान (वय 17 वर्षे रा.गंज पेठ,पुणे ) व दोन्ही आरोपी हे एकाच शाळेत शिकत होते,
गप्पा मारता मारता अयान ने प्रिन्स नावाच्या मित्राला सांगितले कि राज यांच्यात बहिण भावात संबंध ठेवले जातात असे मी ऐकले आहे.
हे ऐकून प्रीस्ने जाऊन राजला सांगितले, हे ऐकल्या नंतर यांच्यात लॉकडाऊन पूर्वी किरकोळ भांडणे झाली,
सदरील भांडणे हे आपापसात मिटविण्यात आली , परंतु प्रिन्स च्या मनात भलतेच काही शिजत होते.
वाचा : मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या सर्व योजनांची तत्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी.
सदरील भांडणानंतर लॉकडाऊन लागल्याने याला काहीही करता आले नाही.
“चहा पेक्षा जास्त केटली च गरम ” असते त्या म्हणी प्रमाणे राज पेक्षा जास्त राग प्रिन्सच्या मनात भरले होते ,
हा संधी शोधात होता. व ती संधी दोन दिवसा पूर्वी मिळाली ,
याचा फायदा घेत आरोपींनी मृत अयान याला मैत्रीच्या आणाभाका घातल्या व गोडगोड बोलून २५ ऑगस्ट रोजी दुपारी एम्प्रेस गार्डन शेजारी, छोटा जुना कॅनाल जवळ नेले.
गप्पा मारता मारता प्रिन्सने सोबत आणलेला चाकू अयान च्या छातीत घुपसला,
यानंतर राजने त्याच्या हातातील चाकू घेऊन अयान वर हल्ला चढवला.
अयान हा मेला असल्याची खात्री होताच या दोघांनी तेथून पळ काढला.
राग संपल्यानंतर या दोघांनी केलेल्या चुकीची भीती वाठू लागल्याने त्यांनी झालेला प्रकार हा घरच्यांना जाऊन सांगितला,
हे ऐकताच त्यांच्या पाया खालची जमीन सरकली व त्यांनी झालेला प्रकार हा पोलिसांना सांगितला व त्या दोघांना पोलिसांच्या ताब्यात दिले.
मृत अयान च्या खून याप्रकरणी शेहनाज घनपुरे (वय ४० वर्षे,रा.गंज पेठ, पुणे) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.
सदरील प्रकरणी त्या दोन्ही अल्पवयीन मुलांवर कलम ३०२,३४ प्रमाणे वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास हे गुन्हे चे पोलिस निरीक्षक सलिम चाऊस करत आहे.
वाचा : बहिणीच्या मुलीलाच मावशी दाखवत होते पॉर्न व्हिडिओ
Pingback: (Pune city) पुणे शहरात दोन चोरीच्या घटना : लाखों रुपये लंपास