ऑर्किड स्कूलविरुद्धचे आरोप खोटे – शाळा प्रशासनाने पुराव्यासह फेटाळले सर्व दावे

पुणे – भवानी पेठ परिसरात नव महाराष्ट्र शिक्षण संस्थेद्वारे संचालित आॅर्कीड स्कूल ही पूर्णपणे अधिकृत असून, शासनाच्या मान्यतेनुसार सुरू आहे. आज शाळेत सर्वसामान्य व अल्पसंख्यांक-मागासवर्गीय कुटुंबातील १५०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दरवर्षी शाळेचा निकालदेखील १०० टक्के लागत असतो. अशा स्थितीत काही समाजकंटकांनी ही आॅर्कीड स्कूल बेकायदेशीर असल्याचा कांगावा चालवलेला आहे. ते एक प्रकारे जनतेची व पत्रकारांची दिशाभूल करीत आहेत. त्यांच्याकडून देण्यात येत असलेली माहिती धादांत खोटी आहे, असा खुलासा एका पत्रकार परिषदेत शिक्षण संस्थेचे चेअरमन नासीर खान तसेच सचिव शाहिदा नासीर खान यांनी केला आहे.

दोन दिवसांपूर्वी जय गृहनिर्माण सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन शाळा पूर्णपणे अवैध असल्याचे सांगितले होते. त्या आरोपांना खोडून काढत शाळेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत शाळेच्या मान्यतेची संपूर्ण कागदपत्रे सादर करीत शाळेवर होणारे आरोप खोटे असल्याचे सांगितले.

शाळेच्या सचिव शाहिदा नासीर खान म्हणाल्या की, सन २००३ पासून आॅर्कीड स्कूल सुरू असून, शाळा पूर्णपणे अधिकृत आहे. शाळेला शिक्षण विभागाची मान्यता असून, शाळेच्या इमारतीदेखील पूर्णपणे सुरक्षित आहेत. आमच्यावर आरोप करणाऱ्या रुक्साना महंमत हुसेन फल्लाह आणि त्यांचे काही सहकारी बिल्डरकडून अधिकचा लाभ घेण्यासाठी शाळेवर खोटे आरोप करीत आहेत.

🖕 Click Here

वास्तविकतः जय गृह निर्माण सोसायटी ही बरखास्त करण्यात आलेली आहे. तरीही फल्लाह आणि त्यांचे काही सहकारी हे सोसायटीचे सदस्य असल्याचे खोटे सांगत आहेत. फल्लाह आणि त्यांचे काही सहकारी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. न्यायालयानेदखील त्यांच्या विरोधात निर्णय देऊन त्यांना चपराक लगावली आहे. शाळा व्यवस्थापने फल्लाह आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर खोटे आरोप केल्याबद्दल केसही दाखल केली आहे. पुणे मनपा प्रशासन असो की शिक्षण विभाग सर्वांनी आमची शाळा अधिकृत असल्याबाबत शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे १५०० विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचा कोणीही प्रयत्न करू नये, असा इशारा त्यांनी पत्रकार परिषदेत दिला.

🖕 Click Here